IndiaStrikesBack- भारतीय वायुसेनेने जवानांचं बलिदान वाया जाऊ दिलं नाही- देवेंद्र फडणवीस

यामध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांसह ५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तर जखमींवर सध्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 11:16 AM IST

IndiaStrikesBack- भारतीय वायुसेनेने जवानांचं बलिदान वाया जाऊ दिलं नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई, २६ फेब्रुवारी २०१९- भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. तब्बल २१ मिनिटं भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं १ हजार किलोंचे बॉम्ब दहशतवाद्यांच्या तळावर फेकले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन भारतीय वायुसेनेचं कौतुक केलं. 'एक भारतीय म्हणून भारतीय सेनेचा मला अभिमान वाटतो. भारतीय सेनेने आज शहीद जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलं आहे. मुंबई ही नेहमीच हाय-अलर्टवर असते, पण म्हणून जनतेने घाबरून जाण्याचं काही काम नाही.'

दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्ययक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर 'भारतीय वायु दलाच्या पायलटांना माझा सलाम' असं ट्वीट केलं. पुलवामा हल्ल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी कोणतंही राजकारण न करता आम्ही सरकारच्या पाठिशी ठाम उभे असल्याचं म्हटलं होतं.

२०० ते ३०० दहशतवादी ठार

बालाकोट या पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. १२ लढाऊ विमानांनी ही कारवाई केली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर १००० किलोंचे बॉम्ब फेकले. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. मिराज २००० या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

Air strike चा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा

Loading...

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, दरम्यान बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर १५ दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय हवाई दलानं एलओसी पार करत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला. जवळपास २१ मिनिटं भारतीय हवाई दलानं हा हल्ला केला. एलओसीपासून ८० किमी आत घुसून भारतीय हवाई दलानं ही कारवाई केली आहे. यामध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांसह ५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तर जखमींवर सध्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बालाकोट येथे ही कारवाई करण्यात आली आहे. १२ ‘मिराज २०००’ विमानांनी पाकच्या नाकावर टिच्चून ही कारवाई केली.

#News18RisingIndia Summit 2019 मधील पंतप्रधान मोदींचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 10:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...