मराठी बातम्या /बातम्या /देश /

तालिबाननंतर पोलिओपासूनही वाचवणार, 'त्या' नागरिकांच्या आरोग्याचीही भारताला काळजी

तालिबाननंतर पोलिओपासूनही वाचवणार, 'त्या' नागरिकांच्या आरोग्याचीही भारताला काळजी

तालिबानच्या (Taliban) विळख्यात अडकलेल्या अफगाणिस्तानमधील (Afghanistan) भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारनं सध्या कंबर कसली आहे. या नागरिकांच्या जीवासोबतच आरोग्याची काळजीही भारताकडून घेतली जात आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : तालिबानच्या (Taliban) विळख्यात अडकलेल्या अफगाणिस्तानमधील (Afghanistan) भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारनं सध्या कंबर कसली आहे.  या सर्वांना विशेष विमानानं नवी दिल्लीमध्ये आणलं जात आहे. अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर सध्या गर्दीचं वातावरण आहे. देश सोडण्यासाठी तिथं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

काबूल विमानातळावरील गर्दीमुळे अफगाणिस्तानमधून येणाऱ्या नागरिकांना कोरोना व्हायरसची (corona virus) लागण होण्याची भीती आहे. ही भीती लक्षात घेऊन या नागरिकांची विमानतळावर RT-PCR टेस्ट केली जात आहे. त्याचबरोबर या नागरिकांना मोफत पोलिओ डोस (Polio vaccine) देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली विमानतळावर यासाठी खास अभियान राबवण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आम्ही अफगाणिस्तानमधून परतलेल्या नागरिकांना मोफत  OPV आणि fIPV हे पोलिओ डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचा जंगली पोलिओ व्हायरसपासून संरक्षण होईल.' असं मांडविया यांनी सांगितले.

काय आहे जंगली पोलिओ व्हायरस?

पोलिओ व्हायरसचे एकूण तीन प्रकार आहेत. यापैकी PV-2 आणि PV3 हे व्हायरस नष्ट झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पण PV-1 चे रुग्ण आजही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठीच भारत सरकारकडून ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

कोण आहे हा चिमुरडा? ज्याला विना पासपोर्ट मिळाली भारतात एन्ट्री

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी वेगानं प्रयत्न सुरु आहेत. रविवारी सकाळी हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान काबूलहून 107 भारतीयांसह एकूण 168 प्रवाशांना घेऊन राजधानी दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचले. तत्पूर्वी रविवारी सकाळी 87 भारतीयांना घेऊन दोन विमाने दिल्लीला पोहोचली.  रविवारी सकाळी अफगाणिस्तानाहून 500 भारतीय मायदेशी परतले आहेत.  अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन विमानांची उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban