अखेर भारतानं रोखलं पाकिस्तानचं पाणी ; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

अखेर भारतानं रोखलं पाकिस्तानचं पाणी ; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखल्याचा दावा केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानचं पाणी रोखण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्या दृष्टीनं भारतानं पावलं देखील उचलली. पण, आता अर्जुन मेघवाल या केंद्रीय मंत्र्यानं पाकिस्तानचं पाणी रोखल्याचा दावा केला आहे. रविवारी अर्जुन मेघवाल बीकानेर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी याविषयीची माहिती दिली. दरम्यान, पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी रोखण्याचा निर्णय भारतानं घेतला होता.

पुलावामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात कर देखील लावला. त्यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र संघात धाव घेत दहशतवाविरोधात आवाज उठवला. त्याला चीन, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटननं देखील पाठिंबा दिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडल्याचं चित्र आहे.


काय आहे सिंधू पाणी करार?

1960 साली झाला करार

पंडित नेहरू आणि आयुब खान यांच्या सह्या

भारत आणि पाकमध्ये पाणी वाटपाबाबतचा करार

सिंधू नदीचं 80 टक्के पाणी पाकला मिळतं

रावी, बियास आणि सतलज नद्यांवर पूर्णपणे भारताचा हक्क

सिंधू, झेलम आणि चेनाबच्या पाण्यावर पाकचा हक्क

3 युद्ध झाली तरी हा करार मोडला नाही

जगातला सर्वात यशस्वी पाणी करार

पाकच्या पंजाब प्रांतासाठी सिंधूचं पाणी अतिशय महत्त्वाचं


पुलवामा हल्ला : जवानांची मोठी कारवाई, वाहनात स्फोटकं ठेवणारा दहशतवादी ठार


करार मोडण्याचे फायदे

पाकला चांगलीच अद्दल घडेल

भारत पाण्याचंही अस्त्र उगारू शकतो याची पाकला जाणीव होईल

पाकच्या जनतेचा तिथल्या सरकारवर दबाव वाढेल

पाककडे पाण्याचं अस्त्र नाही

युद्ध लढण्यापेक्षा हा उपाय सोपा आणि स्वस्त


करार मोडण्याचे तोटे

करार मोडणं निसर्ग आणि मानवतेच्या विरोधात

पंजाब आणि काश्मीरमध्ये पूर येऊ शकतो

आंतरराष्ट्रीय समूदायाकडून भारतावर टीका होईल

जगात भारताची विश्वसनीयता कमी होईल

पाकला एकाकी पाडण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतील

बांगलादेश आणि भूतानसारखे देश अस्वस्थ होतील


VIDEO : सोलापूर की अकोला, कुठून लढणार? प्रकाश आंबडकरांनी दिलं मिश्किल उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 11:54 AM IST

ताज्या बातम्या