मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशाची राजधानी फक्त दिल्लीच का? ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली चार राजधान्यांची मागणी

देशाची राजधानी फक्त दिल्लीच का? ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली चार राजधान्यांची मागणी

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. देशाची राजधानी फक्त दिल्ली (Delhi) का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

    कोलकाता, 24 जानेवारी :  पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. देशाची राजधानी फक्त दिल्ली (Delhi) का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ‘देशाच्या चार राजधान्या हव्यात. संसदेचं सत्र देखील आळीपाळीनं या ठिकाणी व्हावं,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. इंग्रजांच्या काळात कोलकाता (Kolkata) ही देशाची राजधानी होती, याची आठवण करुन देत त्यांनी पुन्हा एकदा कोलकाताची दावेदारी सादर केली आहे. काय म्हणाल्या ममता? नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “देशाला एकच राजधानी का हवी? देशाच्या प्रत्येक दिशेला एक राजधानी पाहिजे. एकूण चार राजधान्या झाल्या पाहिजेत. संसदेचं सत्र देखील सर्व राजधानींच्या शहरात व्हावं. दक्षिण भारतामधील तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये एक राजधानी हवी. दुसरी राजधानी उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान यापैकी एका राज्यात हवी. तसंच बिहार, ओडिशा किंवा कोलकातामध्ये एक राजधानी हवी,’’ अशी मागणी त्यांनी केली. या विषयावर तृणमुल काँग्रेसच्या खासदारांना संसद अधिवेशनात आवाज उठवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. बंगाली अस्मितेचं कार्ड? इंग्रजांच्या काळात सुरुवातीला कोलकाता ही देशाची राजधानी होती. याची आठवण देखील ममता यांनी यावेळी करुन दिली. “एके काळी कोलकाता ही देशाची राजधानी होती. आता पुन्हा एकदा कोलकाताला देशाची दुसरी राजधानी म्हणून का घोषित केलं जात नाही? कोलकाताच देशाची दुसरी राजधानी असेल,’’ असं ममता यांनी यावेळी सांगितलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी ही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या निमित्तानं कोलकाताचा दौरा केला होता. भाजप आणि तृणमुल काँग्रेस हे दोन्ही पक्ष सध्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार असल्याचं दाखवत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कोलकाताला देशाची राजधानी करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. काही महिन्यांमध्येच पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत बंगाली अस्मितेचं आणखी एक कार्ड म्हणून ममता बॅनर्जी या विषयाचा उपयोग करण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Kolkata, Mamata banerjee

    पुढील बातम्या