नवी दिल्ली 23 जून: चीनसोबत सीमावाद ताजा असतानाच आता पाकिस्तानसोबतचाही (Pakistan) तणाव वाढत आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतल्या (Delhi) पाकिस्तानी दुतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर इस्लामाबादमधल्या भारतीय दुतावासातल्या (Indian Ambisi) कर्मचाऱ्यांची संख्याही 50 टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमध्य भारतीय दुतावासातल्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना काही तास ताब्यातही घेण्यात आलं होतं.
दिल्लीतल्या पाकिस्तानी दुतावासातले कर्मचारी हे भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचा संशय परराष्ट्रमंत्रालयाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनसोबतच्या वादावर (India china border dispute) जे वक्तव्य दिलं होतं त्यामुळे लष्कराला (Indian army) मोठा धक्का बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत त्यांनी हा आरोप केला. चीनने भारतीय भूमीवर कब्जा केलेला नाही आणि कुठली पोस्टही घेतलेली नाही असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. राहुल गांधी म्हणाले, चीनने निर्लज्जपणे भारताच्या भूमिवर ताबा मिळवलेला आहे. पंतप्रधांनांच्या या वक्तव्यामुळे अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वादावर खरी परिस्थिती काय आहे हे पंतप्रधानांनी जनतेला स्पष्ट करावं असं आव्हानही त्यांनी दिलं. भारताचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. या फसलेल्या धोरणामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदींवर करण्यात येणाऱ्या टीकेवरूनही मतभेद झाल्याची माहिती समोर आलीय.
चीनशी झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज एमएम नरवणे मंगळवारी लडाख येथे दाखल झाले. त्यांनी प्रथम लेह येथील सैनिक रुग्णालयात जवानांची भेट घेतली. येथील त्यांचा दौरा दोन दिवसांचा आहे.
दिल्लीतील सैन्य कमांडरांच्या परिषदेत हजर झाल्यानंतर ते लेहला रवाना झाले. लडाखमधील उत्तर आर्मीचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांच्याशी ते ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतील. याशिवाय लष्करप्रमुख ग्राउंड कमांडर्ससमवेत डेडलॉकबाबत चर्चा करतील आणि पुढच्या ठिकाणांना भेट देतील.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.