पाकसोबत सौदी अरेबियाच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला काय दिलं भारतानं उत्तर?

पाकसोबत सौदी अरेबियाच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला काय दिलं भारतानं उत्तर?

पाकिस्तान सोबत भारताचा समेट घडावा यासाठी आता सौदी अरेबिया देखील प्रयत्न करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : भारत – पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता आता सौदी अरेबियानं देखील दोन्ही देशांमध्ये मध्यस्तीची तयारी दर्शवली आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल अल जुबैर आज केवळ 4 तासांसाठी भारत भेटीवर येत आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा करणार आहेत. त्यानंतर अदेल जुबैर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी बोलणी करणार आहेत. मागील 20 दिवसांमध्ये अदेल यांनी तिसऱ्यांदा भारताशी बोलणी केली आहेत. त्यामुळे सौदीच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

मागील आठवड्यामध्ये जुबैर यांनी पाकिस्तान दौरा केला होता. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जुबैर 1 मार्च रोजी पुन्हा पाकिस्तानचा दौरा करतील. त्यावेळी ते सौदीच्या राजाचा महत्त्वपूर्ण निरोप घेऊन येतील असं म्हटलं होतं. पण, त्यानंतर मात्र जुबैर यांनी शाह मेहमुद कुरेशी यांच्याशी बोलणी न करता सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क केला.


पवारांची माघार म्हणजे भाजपचा पहिला विजय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सौदीचा मध्यस्तीचा प्रस्ताव भारतानं फेटाळला

दरम्यान, जुबैर यांनी सुषमा स्वराज यांच्याशी 2 मार्च रोजी चर्चा करत भारत – पाकिस्तान मुद्यावर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली होती. पण, भारतानं मात्र त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यावेळी  पाकिस्ताननं केवळ दहशतवाद्यांवर कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे.


रशिया , चीननं देखील दर्शवली होती मध्यस्तीची तयारी

यापूर्वी रशिया आणि चीननं देखील दोन्ही देशांमध्ये मध्यस्तीची तयारी दर्शवली होती. यावेळी बोलताना चीननं दोन्ही देशांनी शांतता राखावी असं आवाहन केलं होतं. पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलली. परिणामी, पाकिस्तान एकटा पडला आहे.


आईसोबत धावती रेल्वे पकडताना 8 वर्षांची चिमुकली पडली; अंगावर शहारे आणणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या