नवी दिल्ली, 4 मे : भारतातून अमेरिकेला होणारी मिठाची निर्यात वाढली आहे. अमेरिकेला भारतातून येणारं हे मीठ खाण्यासाठी लागत नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी लागतं.
युरोप आणि अमेरिकेत बराच काळ बर्फवृष्टी होते आहे आणि वाढत्या बर्फष्टीमुळे मिठाची मागणी वाढली आहे. अमेरिकेतली ही बर्फवृष्टी मीठ उत्पादकांच्या पथ्यावर पडली आहे.
बर्फ हटवण्यासाठी मीठ
बर्फवृष्टी झाल्यानंतर बर्फ काढण्यासाठी मीठ वापरलं जातं. अमेरिकेला लागणाऱ्या मिठापैकी 90 टक्के मीठ भारतातून जातं.
असा हटवला जातो बर्फ
रस्त्यावर पडलेला बर्फ हटवण्यासाठी सोडियम क्लोराइडसारख्या रसायनांचा वापर होत असतो. बर्फवृष्टी झाली तर रस्ते गुळगुळीत बनतात आणि त्यावरून गाडी घसरण्याचा धोका असतो. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावरचा बर्फ हटवावा लागतो.
गुजराथचं मीठ चीनमार्गे अमेरिकेला
गुजराथमध्ये तयार होणारं मीठ चीनमार्गे युरोप, अमेरिका आणि रशियाला नेलं जातं. यामध्ये वाहतुकीचा खर्च कमी होतो. चीनही भारतातून मीठ आयात करतो आणि कमी दर्जाचं मीठ बर्फ हटवण्यासाठी अमेरिकेला पाठवतो.
मिठाच्या निर्यातीत दुपटीने वाढ
भारतीय मीठ उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत भारतातून चीनला होणाऱ्या मिठाची निर्यात दुपटीने वाढली आहे. अमेरिकेमध्ये बर्फ हटवण्यासाठी आधी कमी दर्जाचं मीठ वापरलं जात होतं पण आता तिथेही चांगल्या दर्जाचं मीठ वापरलं जातं.
कच्छमधल्या मीठउत्पादकांचा फायदा
सप्टेंबर महिन्यापासून या मिठाची मागणी वाढते. या काळात दर महिन्याला 7 ते 8 लाख टन मिठाची निर्यात होते. गुजरातच्या कच्छमधल्या मीठ उत्पादकांना या काळात त्यामुळे घसघशीत फायदा होतो.
====================================================================================
VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स