Home /News /national /

24 तासांत तब्बल 13586 नवीन रुग्णांची नोंद, तरी दिलासादायक आहे 'ही' आकडेवारी

24 तासांत तब्बल 13586 नवीन रुग्णांची नोंद, तरी दिलासादायक आहे 'ही' आकडेवारी

पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो.

आज सगळ्यात जास्त म्हणजे 13 हजार 586 रुग्णांची नोंद झाली. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. तर, 24 तासांत तब्बल 336 रुग्णांचा मृत्यू झाला.

    नवी दिल्ली, 19 जून : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा एका आठवड्यापासून 10 हजारांच्या घरात आहे. आज सगळ्यात जास्त म्हणजे 13 हजार 586 रुग्णांची नोंद झाली. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. तर, 24 तासांत तब्बल 336 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 80 हजार 532 झाला आहे. हा आकडा चिंता वाढवणारा असला तरी, एका आकडेवारी दिलासा देणारीही आहे. भारतात सध्या 1 लाख 63 हजार 248 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा हा 2 लाख 04 हजार 711 झाला आहे. सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक दिवसेंदिवस वाढत आहे की भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. सध्या यांच्यात तब्बल 41 हजार 462चा फरक आहे. तर आतापर्यंत 12 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 3752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 20 हजारहून अधिक आहे. तर, 1672 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 5751 झाला आहे. इतर राज्यांची परिस्थिती. भारताचा रिकव्हरी रेटही वाढत आहे. आता हा रेट 53% हून 53.8% झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील निरोगी रुग्णांची संख्या वाढली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 3884 निरोगी रुग्ण आहेत तर 2887 नवीन रुग्ण आहेत. तमिळनाडूमध्येही एक हजारहून अधिक निरोगी रुग्ण आहेत. संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या