कोरोनानं देशात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले, एकाच दिवसात तब्बल 12881 नवीन रुग्णांची नोंद

कोरोनानं देशात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले, एकाच दिवसात तब्बल 12881 नवीन रुग्णांची नोंद

सलग पाचव्या दिवशी 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. गेल्या 24 तासात आतापर्यंत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : भारतातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी सरकारची चिंता वाढवली आहे. सलग पाचव्या दिवशी 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. गेल्या 24 तासात आतापर्यंत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात देशात तब्बल 12 हजार 881 नवीन रुग्ण आढळून आले. यासह भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 66 हजार 946 झाली आहे. पहिल्यांदाच नवीन कोरोनाबाधितांचा आकडा हा 12 हजारहून जास्त आहे.

याशिवाय, भारतात 12 हजार 237 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. असे असले तरी दुसरीकडे निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्याही काही कमी नाही आहे. भारतात आतापर्यंत 1 लाख 94 हजार 324 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी 3307 रुग्णांनी नोंद झाली. तर, 114 लोकांचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईत 1365, ठाण्यात 839 तर पुण्यात 362 रुग्ण आढळून आले. यासह राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा हा 1 लाख 16 हजार 752 झाला आहे. यातील 51 हजारहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर 5600हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.

भारत एकूण रुग्णांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर असला तरी नवीन रुग्णांच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी ब्राझील आणि अमेरिका यांचा क्रमांक लागतो.

दिलासादायक आकडेवारी

एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी भारताचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 52.8% वरून आता 53% झाला आहे. त्याचबरोबर मृत्यू दरही कमी झाला आहे. भारताचा मृत्यू दर सध्या 3.3% आहे. तर, सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्णांमधील फरक हा 33 हजार 940 आहे. आसाम, बिहार, छत्तीसगढ, चंदीगढ, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

50 दिवसांआधी देशात 31 हजार केस

worldometers नुसार भारतात 50 दिवसात 11 पटीनं जास्त रुग्ण वाढले आहे. 50 दिवस आधी म्हणजे 28 मे रोजी देशात 31 हजार 342 रुग्ण होते. तर मृतांचा आकडा 1008 होता. तर जगभरात 28 मे रोजी 31 लाख एकूण रुग्ण होते. जे 18 जूनपर्यंत 84 लाख झाले. तर मृतांचा आकडा 2.21 लाख होता. आता हाच आकडा 4.48 लाख झाला आहे.

First published: June 18, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या