भयंकर! रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर, 24 तासांतील आकडेवारीनं वाढवली चिंता

भयंकर! रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर, 24 तासांतील आकडेवारीनं वाढवली चिंता

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जुलै : देशात गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्ण हे 20 हजारांच्या वर आहे. गेल्या 24 तासांतही 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्म निरोगी झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे.

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतानं रशियाला मागे टाकले आहे. याचबरोबर भारताचा पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसांत सर्वात जास्त आहे. देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 13.42 % आहे. तर मृत्यूदरही वाढत आहे.

वाचा-हवेतूनही पसरतो कोरोनाव्हायरस! 32 देशांच्या 239 वैज्ञानिकांनी केला दावा पण...

वाचा-2500 रुपयांत मिळवा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट! रुग्णालयाची धक्कादायक ऑफर

देशाचा रिकव्हरी रेट 60% हून जास्त झाला आहे. 7 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत, जिथं 75%हून जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. 4 राज्यांत तर 80% हून जास्त रुग्ण निरोगी झाले आहे. यात चंदीगड सर्वात अव्वल आहे.

राज्यांची आकडेवारी

रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा आकडा

देशात सध्या कोरोनाचे6 लाख 97 हजार 413 कोरोना रुग्ण आहेत. यासह रशियाला मागे टाकत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रशियामध्ये कोरोनाचे 6 लाख 81 हजार 251 रुग्ण आहेत. कोरोनाच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत 29 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 17 हजार 244 नवीन प्रकरणं समोर आली. अमेरिकेत कोरोनामुळं 1 लाख 32 हजार 382 लोकांचा मृत्यू झाला.

वाचा-कोरोनानंतर आता आणखी एका भयंकर आजाराचे संकट, चीनमध्ये हाय अलर्ट जारी

संपादन-प्रियांका गावडे.

Published by: Manoj Khandekar
First published: July 6, 2020, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading