कोरोनाने पहिल्यांदाच 24 तासांत गाठला भयानक टप्पा, तरी 'या' आकडेवारीनं दिला दिलासा

कोरोनाने पहिल्यांदाच 24 तासांत गाठला भयानक टप्पा, तरी 'या' आकडेवारीनं दिला दिलासा

आज पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जुलै : देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा मोठ्या तेजीनं वाढत आहे. आज पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले. तर, गेल्या 24 तासांत 379 लोकांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 लाख 25 हजार 544 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 79 हजार 891 रुग्ण निरोगीही झाले आहेत.

देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात 6330 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर दिल्लीत 2373. तामिळनाडुमध्ये 4343, उत्तर प्रदेश 817, पश्चिम बंगाल 649, राजस्थान 350 आणि पंजाबमध्ये 120 रुग्ण सापडले. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी, भारतात निरोगी रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. भारताचा रिकव्हरी रेट 60% झाला आहे.

राज्याची आकडेवारी

दिलासा देणारी आकडेवारी

देशातील सक्रीय रुग्ण आहे निरोगी रुग्ण यांच्यातील फरक वाढत आहे की चांगली बाब आहे. सक्रीय रुग्णांपेक्षा निरोगी रुग्ण जास्त आहे. दररोज जवळजवळ 20 हजार रुग्ण निरोगी होत आहेत. दिल्लीत सर्वात जास्त 60 हजार रुग्ण निरोगी झाले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीचा रिकव्हरी रेट 68.4% आहे. तर, महाराष्ट्रात 1 लाख रुग्ण निरोगी झाले आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 54.2% आहे.

चाचणी क्षमता जवळपास 10 पट वाढवण्याची गरज

देशात आतापर्यंत 93 लाखांहून अधिकांची चाचणी करण्यात आली आहे. मात्र सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे (CCMB) प्रमुख राकेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला चाचणी क्षमता जवळपास 10 पट वाढवण्याची गरज आहे. सोमवारी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलासाई सुंदरराजन आणि इतरांसह व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी हे सांगितले.

संपादन-प्रियांका गावडे

First published: July 3, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading