सार्क परिषद : पाकिस्तानचा प्रस्ताव भारतानं धुडकावला

'दहशतवादाला खतपाणी घालणं बंद केल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा करण्यात येणार नाही'

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 07:44 PM IST

सार्क परिषद : पाकिस्तानचा प्रस्ताव भारतानं धुडकावला

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं पाकिस्तानचं निमंत्रण भारतानं धुडकावलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालणं बंद केल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा करण्यात येणार नाही असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी स्पष्ट केलं. करतारपूर कॉरिडॉरचा निर्णय झाला ही आनंदाची गोष्ट असली तरी हा उपक्रम म्हणजे चर्चेची सुरुवात नाही असही त्या म्हणाल्या.


पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने मंगळवारी असा प्रस्ताव भारताला दिला होता. मात्र दहशतवाद बंद झाल्याशिवाय चर्चा नाही ही भारताची भूमिका आहे. हिंसा आणि शांतता एकाच मार्गावर चालू शकत नाही असंही भारतानं स्पष्ट केलं होतं.

पठाणकोटमधल्या हवाई तळावरचा हल्ला, काश्मिरमधल्या हिंसक घटनांमध्ये झालेली वाढ यामुळं यापुढं पाकिस्तानशी चर्चा करायची नाही असं भारताचं धोरण आहे.


इम्रान खान पंतप्रधान पदावर आल्यानंतर त्यांनीही भारताला पत्र लिहून चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारतानं तोही प्रस्ताव फेटाळून लावला होता. भारतानं सार्क परिषदेमधून अंग काढून घेतल्यानं सार्क परिषदेला तसा अर्थच राहत नाही. त्यामुळं यावर्षीची परिषदही बारगळण्याचीच शक्यता आहे.


करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन


भारतातल्या पंजाबमधल्या गुरूदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नानक या स्थानापासून ते पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या करतारपूर साहेब यांना महामार्गाने जाडण्यात येणार आहे. त्या मार्गाला 'करतारपूर कॉरिडॉर' असं नाव देण्यात आलंय. ही दोनही स्थानं शीख धर्मियांसाठी अतिशय पवित्र समजली जातात.


गेल्या अनेक दशकांपासून 'करतारपूर कॉरिडॉर'साठी शिख बांधव मागणी करत होते. काही दिवसांपूर्वीच या कॉरिडॉरला केंद्र सरकारनं मान्यता दिली. तर पाकिस्तान सरकारनेही या प्रकल्पाला मान्यता दिलीय. भारतातल्या पंजाब मधल्या गुरूदासपूर आणि पाकिस्तानातल्या पंजाब मधल्या करतारपूरला महामार्गने जोडण्यात येणार आहे. त्यामुळं व्हिसा न घेताही दोन्ही देशांचे भाविक ये जा करू शकणार आहेत.


 


 

VIDEO: पुण्यात अग्नितांडव, तब्बल 150 झोपड्या आगीत जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close