News18 Lokmat

'पुन्हा हल्ल्याचं विधान बेजबाबदारपणाचं', भारतानं फेटाळला पाकचा दावा

भारतानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं विधान बेजबाबदार तसंच निराधार असल्याचे म्हणत त्यांनी केलेला दावादेखील फेटाळून लावला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 08:02 AM IST

'पुन्हा हल्ल्याचं विधान बेजबाबदारपणाचं', भारतानं फेटाळला पाकचा दावा

नवी दिल्ली, 8 एप्रिल : 'भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करेल', अशी भीती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी बोलून दाखवली. पण भारतानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं विधान बेजबाबदार तसंच निराधार असल्याचे म्हणत त्यांनी केलेला दावादेखील फेटाळून लावला आहे.

'भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. 16 ते 20 एप्रिलदरम्यान भारताकडून हल्ला केला जाईल', असा दावा कुरेशी यांनी केला. पण भारताकडून पाकिस्तानचा हा दावा फेटाळण्यात आला आहे.

याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, 'पाकिस्तानला आपल्या दहशतवाद्यांकडून भारतात घातपात करायचा असल्याचं त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानावरून दिसत आहे. मुख्य मुद्यावरून भरकटवण्याचे विधान करण्याऐवजी पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात ठोस पाऊल उचलले पाहिजे.'

शिवाय, सीमारेषेवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात तितकंच चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे, असंही परराष्ट्रीय मंत्रालयानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.

वाचा अन्य बातम्या

Loading...

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल सरकार जबाबदार-उद्धव ठाकरे

देशाला वाचवायचं असेल तर मोदींना गुजरातमध्ये परत पाठवा-हार्दिक पटेल

निवडणुकीत हिंसाचार घडविण्याचा माओवाद्यांचा इशारा, सुरक्षा दलांचा हाय अलर्ट

नेमकं काय म्हणाले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री?

'भारत 16 ते 20 एप्रिलदरम्यान पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करण्याची योजना आखत आहे', असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी (7 एप्रिल)गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत केला होता. 'भारतानं पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक केला. तसाच हल्ला पुन्हा केला जाईल', अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला घडवण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईकची कारवाई केली. या कारवाईत बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला करण्यात आला. यात जवळपास 300 ते 400 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती भारतीय वायुदलानं दिली होती.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 07:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...