नवी दिल्ली, 17 जून : देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus In India) पहिला मृत्यू झाल्यानंतर 100 दिवसांच्या आतच 10 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू 12 मार्चला झाला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, 16 जून रोजी 2004 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यातील 1672 लोकांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. या 1672 रुग्णांचा समावेश केल्यास, भारतातील एकूण मृत कोरोनाबाधितांचा आकडा हा 11 हजार 919 होईल. रिपोर्टनुसार देशातील केस फॅटेलिटी रेट 2.9 टक्के होता आता 3.4% झाला आहे. एकूण संक्रमितांचा आकडा 3 लाख 53 हजार 853 असून यातील 11 हजार 919 मृतांनंतर CFR 2.4% होता आता 3.9% झाला आहे.
मंगळवारी कोव्हिड-19 संक्रमितांच्या मृतांमध्ये 83% महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तमिळवनाडूमधील आहेत. 10 प्रभावित प्रदेशांमध्ये 96% हून अधिक कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.
वाचा-देशात आता दररोज होणार 3 लाख लोकांची चाचणी
गेल्या आठवड्यात 2500 मृत्यू
देशात पहिल्या 5000 मृत केसेस 80 दिवसांत आल्या, त्यानंतर केवळ 17 दिवसांत 5000 मृत्यू झाले, ज्यामध्ये गेल्या आठवड्यात 2500 हून अधिक लोक मरण पावले. कोरोनामुळे भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश आहे, तर कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत आठव्या क्रमांकावर आहे.
वाचा-कोरोना योद्धांच्या मदतीला SMART WATCH; रुग्णाजवळ न जाता डॉक्टरांना मिळणार माहिती
राज्यांतील आकडेवारी
पीटीआयच्या म्हणण्यानुसार 16 जून रोजी रात्री दहा वाजेपर्यंत बिहारमध्ये 40 चंदीगडमध्ये 39, छत्तीसगडमध्ये 8, दिल्लीत 1400, गुजरातमध्ये 1534, जम्मू-काश्मीरमध्ये 63, झारखंडमध्ये 9, महाराष्ट्रात 4128, उत्तर प्रदेशात 399 आणि उत्तराखंडमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये 485, पंजाबमध्ये 72 आणि राजस्थानमध्ये 301 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वाचा-कोरोनाचा आता माशांनाही धोका, समुद्रात जमा होतोय मास्क आणि PPE किटचा कचरा