कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या भारतीय डॉक्टरांना चीनचे PPE सूट, 1.70 लाख किट मिळाले

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या भारतीय डॉक्टरांना चीनचे PPE सूट, 1.70 लाख किट मिळाले

ज्या राज्यांना जास्त गरज आहे अशा राज्यांना हे सुट पाठवले जणार आहेत. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 06 एप्रिल : भारतात आता कोरोनाचा जोर वाढत आहे. दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये कोरोनाचा प्रचंड धुमाकूळ होता. आता चीनमध्ये कोरोनाला अटकवा झाला आहे. आता चीन अनेक देशांना मदत करतोय. भारतात प्रोटेक्‍शन एक्विपमेंट (PPE) सूटची कमतरता आहे. त्यामुळे चीनने भारताला 1 लाख 70 हजार PPE Suit दिले आहेत. सोमवारी हे सर्व सूट मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

तर भारतात 20 हजार सूटची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या राज्यांना जास्त गरज आहे अशा राज्यांना हे सुट पाठवले जणार आहेत. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना आघाडीवर लढावं लागतं अशा कर्मचाऱ्यांसाठी ते सुट वापरले जाणार आहेत.

देशात वेळेवर लॉकडाऊन जाहीर केला असला, तरी देशाच्या काही भागात Coronavirus तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी आहे, असं गुलेरिया म्हणाले.

हे वाचा - कुटुंबाच्या आठवणीने डॉक्टरच्या डोळ्यात अश्रू म्हणाली, हे कोरोनाविरोधात युद्ध!

'आज तक'शी बोलताना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे AIIMS संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले, "संपूर्ण देशाचा विचार केला, तर सध्या भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये आहे. लोकलाइज्ड स्प्रेड असं त्याला म्हणतात." पण कोरोनाव्हायरसची लागण कुठून झाली याचा कुठलाही थांग लागत नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. हे तिसऱ्या टप्प्याचं लक्षण आहे. "मुंबईचा काही भाग आणि देशातले कोरोना हॉटस्पॉट ठरलेले भाग इथे मात्र हा कम्युनिटी स्प्रेड इतक्या झपाट्याने होतो आहे की तिथे या साथीने तिसरी स्टेज गाठली आहे", असं गुलेरिया म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते, हा लोकलाइज्ड कम्युनिटी स्प्रेड आहे तिथेच रोखला आणि तो आणखी इतर परिसरांमध्ये पसरू दिला नाही, तर भारत बराच काळ दुसऱ्या टप्प्यात राहू शकतो आणि कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिर राहू शकते.

वाचा - Lockdown पोलिसांच्या पथकावर टवाळखोरांचा हल्ला, IPS अधिकारी जखमी

कोरोनाव्हायरसचा फैलाव ज्या वेगाने होतो, त्या वेगानुसार ही साथ कुठल्या टप्प्यात आहे हे ओळखता येतं आणि त्यानुसार उपाययोजना करता येतात. भारतात आता हळूहळू चाचणीचं प्रमाण वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. कोरोना विषाणूचा फैलाव गुणाकार पद्धतीने वाढतो. त्याला डबलिंग इफेक्ट म्हणतात. अत्यल्प काळात रुग्णांची संख्या दुपटीने वाढते. हा डबलिंग इफेक्ट वाढला की तिसरा टप्पा जवळ आला असं समजलं जातं.

First published: April 6, 2020, 11:24 PM IST

ताज्या बातम्या