Home /News /national /

लाच घेण्यात भारत पहिल्या क्रमांकावर; भ्रष्टाचाराचे आकडे पाहून बसेल धक्का, दुसऱ्या क्रमांकावर तर...

लाच घेण्यात भारत पहिल्या क्रमांकावर; भ्रष्टाचाराचे आकडे पाहून बसेल धक्का, दुसऱ्या क्रमांकावर तर...

गेल्या 12 महिन्यांत लाच घेण्याचं प्रमाण वाढलं असल्याचे सांगितलं जात आहे

    नवी दिल्‍ली, 26 नोव्हेंबर : लाचलुचपत प्रकरणात भारताची स्थिती आशिया खंडात सर्वात वाईट आहे. येथे लाच घेण्याचे प्रमाण 39% इतके आहे. ट्रान्स्परेन्सी इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणानुसार, गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं असल्याचं 47% लोकांचा वाटतं तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार चांगले काम करीत आहे, असे 63 टक्के लोकांचं मत आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील 46% लोक सरकारी सुविधांसाठी खासगी कनेक्शनचा वापर केला जातो. अहवालात दिल्यानुसार लाच देणाऱ्यांमधील अर्धे लोकांनी लाच (bribery rate in india) मागितली आहे. तर खासगी कनेक्शनचा वापर करणाऱ्यांमध्ये 32 टक्क्यांनी सांगितलं की, असं केलं नाही तर त्यांचं काम होणार नाही. भारताच्या शेजारील देशांची अवस्था काय आहे? भारतात सर्वात जास्त लाचखोरी भारतानंतर सर्वाधिक लाच कम्बोडियामध्ये घेतली जाते. येथे 37 टक्के लोक लाच देतात. 30 टक्क्यांसह इंडोनेशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. मालदीव आणि जपानमध्ये लाच घेण्याचं प्रमाण आशियात सर्वात कमी आहे. येथे 2 टक्के लोक लाच घेतात. दक्षिण कोरिया आणि जपानची स्थितीही बरी आहे. ट्रान्स्परेन्सी इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश नव्हता. बांगलादेशात लाच घेण्याचे प्रमाण भारतापेक्षा खूपच कमी (24%) आहे तर श्रीलंकेत ते 16% इतके आहे. हे ही वाचा-IFS अधिकाऱ्याचा प्रताप; पुण्यात फार्महाऊस..लॉकडाऊनमध्ये चार्टर्ड प्लेनने पिकनिक सरकारी भ्रष्टाचारामुळे लोक त्रस्त 'ग्लोबल करप्शन बॅरोमीटर - आशिया' नावाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या सर्वेक्षणात अहवालासाठी ट्रान्स्परेन्सी इंटरनॅशनलने 17 देशांमधील 20,000 लोकांना याबाबत प्रश्न विचारले आहेत. हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर दरम्यान करण्यात आले. त्यांना गेल्या 12 महिन्यांतील भ्रष्टाचाराच्या अनुभवांची माहिती विचारण्यात आली. सर्वेक्षणात सहा प्रकारच्या सरकारी सेवांचा समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, सरकारी भ्रष्टाचार ही त्यांच्या देशातली सर्वात मोठी समस्या आहे. दर तीनपैकी एक व्यक्ती सर्वात भ्रष्ट असल्याचे दिसते. मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलँडमध्ये सेक्शुअल एक्सटॉर्शनचा मुद्दादेखील रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचा खुलासा होण्याची भीती भारतात सर्वेक्षण झालेल्यांपैकी पोलिसांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 42% लोकांनी लाच दिली. ओळखपत्रांसारखी सरकारी कागदपत्रे मिळविण्यासाठी 41% लोकांना लाच द्यावी लागली. खासगी कनेक्शनचा वापर करीत काम करवून घेणाऱ्यात सर्वाधित जास्त पोलीस (39%), आयडी मिळविण्यासाठी (42%) आणि कोर्टाच्या प्रकरणात (38%) इतके आहे. या अहवालात एक चिंताजनक आकडेवारी देखील देण्यात आली आहे की भ्रष्टाचाराची नोंद करणे महत्वाचे आहे परंतु 63% त्याच्या परिणामाची भीती बाळगतात.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या