मराठी बातम्या /बातम्या /देश /RRB NTPC Result Student Protest: रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वे रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना नोकरी नाही

RRB NTPC Result Student Protest: रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वे रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना नोकरी नाही

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आरआरबी एनटीपीसी(NTPC) निकालाबाबत बिहारमधील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली, 26 जानेवारी: आरआरबी एनटीपीसी(NTPC) निकालाबाबत बिहारमधील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने NTPC आणि लेव्हल 1 च्या परीक्षेवर बंदी घातली आहे. तसेच एक पत्रका जारी करत रेल्वे रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना नोकरी देण्यात येणार नाही. असे स्पष्ट केले आहे.

14 जानेवारी रोजी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधीलरेल्वे सेवा कोलमडली आहे. मंगळवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यानंतर रेल्वेने एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये, रेल्वेत नोकरी मिळवण्यास इच्छुकांचा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आढळल्यास रेल्वेत नोकरी मिळवण्याबाबतीत आजीवन बंदीला सामोरे जावे लागू शकते. रेल्वे मंत्रालयानं पत्रक काढून हा निर्णय घेतलाय. रेल्वे रुळावर निदर्शनं करुन सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या उमेदवारांचा व्हीडिओ तपासला जाईल. दोषी असल्यास त्यांना रेल्वेत कधीच नोकरी दिली जाणार नाही असंही या पत्रकात म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती उत्तीर्ण विद्यार्थी आणि परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुद्दे ऐकून घेणार असून ही समिती आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करणार आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालय पुढील निर्णय घेईल.

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला होता. आंदोलनामुळं संबंधित ट्रॅकवरील वाहतूक बंद झाली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, विद्यार्थी तिथं पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेलं. सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये विद्यार्थी दगडफेक करत असल्याचे दिसून आले आहे.

First published:

Tags: Bihar, Indian railway