News18 Lokmat

भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला; दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी प्लॅन तयार

भारताचा दबाव आता कामी येताना दिसत आहे. कारण, दहशतवाद्यांविरोधात कारवाईच्या विचारात पाकिस्तान आहे. त्यासाठी पाकिस्ताननं नॅशनल अॅक्शन प्लॅन देकील तयार केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 11:40 AM IST

भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला; दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी प्लॅन तयार

इस्लामाबाद, 4 मार्च : दहशतवाद्यांचं आश्रय स्थान म्हणजे पाकिस्तान. ही बाब काही लपून राहिलेली नाही. पण, पाकिस्ताननं मात्र याबाबत कायमच हात वर केले. पण, पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलायला सुरूवात केली. शिवाय, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड आणि चीन सारखे देश देखील दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्र संघात एकत्र आले. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला. अखेर सर्व परिस्थिती पाहता दहशतवादाच्या मुद्यावर हात वर करणारा पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी पाकिस्ताननं 'नॅशनल अॅक्शन प्लॅन' देखील तयार केला आहे. 'डॉन' या पाकिस्तानातील आघाडीच्या वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या प्लॅननुसार पाकिस्ताननं रविवारी दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली 53 संघटनांवर कारवाई केली. पाकिस्तानच्या जमिनिचा वापर हा कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी करू दिला जाणार नाही असं परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त; सॅटेलाईट फोटो आले समोर


Loading...

'मसूद'विरोधात UNSCमध्ये प्रस्ताव

दरम्यान, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा असा प्रस्ताव मांडला. त्यानंतर चीननं देखील आपलं मत या देशांच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम देशांनी देखील दहशतवादाला तीव्र विरोध केला. शिवाय, OICमध्ये भारताला देखील आमंत्रण दिलं. या साऱ्या घडामोडी पाहता पाकिस्तान एकटा पडला.


Air strike : 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं? - पी. चिदंबरम


पाकिस्तानचा मोठा निर्णय

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावर प्रचंड दबाव वाढला. या पार्श्वभूमीवर, 'जैश-ए-मोहम्मद'सहीत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटनांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चक्क यू-टर्न घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)दहशतवाद्यांच्या यादीमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला नावाचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तान समर्थन दर्शवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'मध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आले आहे. एकीकडे दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान 'जैश-ए-मोहम्मद'बाबतच्या आपल्या भूमिकेवरुन यू-टर्न घेणार असल्याचे म्हटलं जातं आहे. तर दुसरीकडे, किडनीच्या आजारामुळे मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती गुप्तहेर खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांकडून 'CNN News18' ला मिळाली. पण पाकिस्तान किंवा 'जैश-ए-मोहम्मद'कडून अद्याप मसूदच्या मृत्यूसंदर्भात अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही.


VIDEO ...आणि धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला पोलिसाने पायातल्या बूट काढून चोपलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 11:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...