मुंबई, 6 ऑगस्ट– भारतात सर्वदूर आरोग्य सेवा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे बरेचदा आदिवासी आणि दुर्गम भागतील गर्भवती महिलांना झोळीतून हॉस्पिटलपर्यंत (Hospital) नेलं जातं. कधीकधी तर वाटेतच ती गर्भवती महिला प्रसूत होते. अशा बातम्या आपण अनेकदा वाचल्या असतील. पण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका गर्भवती महिलेवर रिक्षेमध्ये प्रसूत (Delivery in Autorickshaw) होण्याची वेळ आली. पण तिच्या मदतीला पोलीस सब इन्स्पेक्टर आणि पोलीस शिपाई महिला आल्यामुळे तिला दिलासा मिळाला.
वेब दुनियाने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील (Ramgarh District) सुठालिया पोलीस ठाण्यात सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) म्हणून काम करणाऱ्या अरुंधती राजावत आणि महिला पोलीस शिपाई इतिश्री राठोड यांनी प्रचंड पावसामुळे रस्त्यावर अडकून पडलेल्या ग्रामीण गर्भवती महिलेची ऑटो रिक्षेत प्रसूती करण्यासाठी मेडिकल स्टाफला बोलवलं आणि एक नवा आदर्शच समाजासमोर ठेवला आहे. जनतेचं रक्षण करणं ही पोलीस आणि इतर सुरक्षा दलांची जबाबदारी असते पण पोलीस त्याही पलीकडे जाऊन अनेकदा आपलं कर्तव्य बजावताना दिसतात.
(हे वाचा: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी)
राजगड जिल्ह्यात प्रचंड पाऊस होत आहे. त्यामुळे सगळे रस्ते बंद झाले आहेत. त्यातच मोरपानी या गावातल्या एक गर्भवती महिलेला तिचे नातेवाईक रिक्षेतून (Auto Rickshaw)हॉस्पिटमध्ये नेत होते. पण प्रचंड पावसामुळे त्यांची रिक्षा वाटेतच अडकून पडली. याबद्दलची मीहिती एसआय अरुंधती राजावत आणि पोलीस शिपाई इतिश्री राठोड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी मेडिकल स्टाफ तिथे नेऊन त्यांच्या मदतीने रिक्षेतच त्या महिलेची डिलिव्हरी केली. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.
समाजाचं संरक्षण करतानाच सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावून गेलेल्या या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. अडचणीच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे.
(हे वाचा: भारतीय विद्यार्थ्याची चीनमध्ये निर्घृण हत्या, सडलेल्या मृतदेहाचा वास सुटल्याने झ)
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Home Minister of Madhya Pradesh) यांनी ट्विट करून या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘शाब्बास SI अरुंधती, पोलीस शिपाई इतिश्री. राजगड जिल्ह्यातील सुठालिया पोलीस ठाण्यात महिला सब इन्स्पेक्टर असलेल्या अरुंधती राजावत आणि पोलीस शिपाई इतिश्री राठोड यांनी प्रचंड पावसात रिक्षेत अडकलेल्या गर्भवती महिलेची प्रसूती करण्यासाठी मदत करून आई आणि बाळाला नवा जन्मच दिला आहे. असं करून तुम्ही मध्य प्रदेश पोलिसांचं ब्रीद वाक्य ‘देशभक्ती के साथ जनसेवा’ याला अनुसरून दैनंदिन जीवनात प्रेरणाघेण्या योग्य एक उदाहरण समाजासमोर मांडलं आहे. संपूर्ण पोलीस परिवाराला तुम्हा दोघींचा अभिमान वाटतो.’ अशा शब्दांत गृहमंत्री मिश्रा यांनी कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Police