LIVE India Pak Tensions : अमेरिकेची शस्त्रास्त्र त्यांच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही पाक

LIVE India Pak Tensions : अमेरिकेची शस्त्रास्त्र त्यांच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही पाक

युद्धाची परिस्थिती ओढवली तरीही भारताविरुद्ध पाकिस्तानला अमेरिकन शस्त्र वापरता येणार नाहीत, असं अमेरिकेच्या इशाऱ्यावरून दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पाकिस्तान अमेरिकेच्या परवानगीशिवाय त्यांनी दिलेली शस्त्रास्त्रं वापरू शकत नाही, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेने वेळोवेळी पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान याचा पुरवठा केला आहे. आता युद्धाची परिस्थिती ओढवली तरीही भारताविरुद्ध पाकिस्तानला ही अमेरिकन शस्त्र वापरता येणार नाहीत, असं अमेरिकेच्या या ताज्या इशाऱ्यावरून दिसत आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला परवानगीशिवाय शस्त्र न वापरण्याचं सांगितलं आहे, अशी बातमी टाईम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी जो काही करार झाला, त्यात हे अंतर्भूत होते. त्यामुळे याच कराराच्या तरतूदीची आठवण अमेरिकेने दिली आहे.

अमेरिका हे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे दोन्ही देशांना अमेरिकेकडून मदत मिळालेली आहे. आता मात्र युद्ध परिस्थिती ओढवली, तर या शस्त्रांचा वापर पाकिस्तानने भारताविरुद्ध करू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे.

आत्तापर्यंत काय काय झालं?

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा भारताचा दावा होता आणि त्यानुसार पाकिस्तानवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला. 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि हे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी मारले असल्याचा भारताचा दावा आहे. यावर पाकिस्तानने हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा बदला घेण्याची भाषा वापरली.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताच्या 2 वैमानिकांना अटक, एकजण रुग्णालयात; पाकिस्तानचा खळबळजनक दावा

सियालकोटमध्ये लष्कराच्या हालचालीत वाढ, पाकिस्तानी सेनेने तयार केले टँक- रिपोर्ट

 भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.

संबंधित बातम्या

India-Pak Tension : भारताचं विमान आम्ही पाडलं नाही, पाकिस्तान तोंडघशी

Surgical Strike 2.0 : रात्रभर पंतप्रधान झोपले नाहीत, हवाई हल्ल्यावर ठेवून होते लक्ष

भारताची ही 10 शस्त्र, ज्यामुळे पाकिस्तानचा निभाव लागत नाही!

First published: February 27, 2019, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading