INDIA Pak Tensions भारताचं मिराज2000 विरुद्ध पाकिस्तानचं F-16 कुठलं लढाऊ विमान आहे अधिक सक्षम?

भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातली फ्रेंच बनावटीची मिराज2000 विमान चांगली की पाकिस्तान हवाईदलातली F16 फाल्कन जेट? दोन लढाऊ विमानांनी काय कामगिरी केली आहे आणि कोण ठरलंय सरस?

  • Share this:

मंगळवारी पहाटे भारताने आपल्या हवाईदलातली 12 लढाऊ  विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवली आणि तिथल्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळांचा अचूक वेध घेतला. ही विमानं होती - फ्रेंच बनावटीची मिराज2000

Mirage2000 ही त्याच दासाँ एव्हिएशन या फ्रेंच कंपनीने बनवलेली आहेत, ज्यांच्याकडे भारताने राफेल विमानांचं कंत्राट दिलं. आज तो राफेल करार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

पाकिस्तानने भारताच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी त्यांच्या ताफ्यातली F16 फाल्कन फायटर जेट विमानं पाठवली आणि भारताने युद्धदक्षता दर्शवत ती वेळीच परतवली. एक F16 जेट भारताने पाडलं.

F16 फाल्कन फायटर जेट ही अमेरिकन बनावटीची लढाऊ विमानं असून तिथल्या लॉकहिड मार्टिन कंपनीने बनवलेली आहेत.

1982मध्ये पाकिस्तानने या अमेरिकन कंपनीकडून F16 फायटर जेट घेतली म्हणूनच भारताने फ्रेंच कंपनीकडून मिराज2000 विमानं मागवली. त्या वेळी भारतीय हवाईदलात 40 मिराज विमानं दाखल झाली.

1985मध्ये मिराज2000 भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानंतर भारताने त्याचं नामकरण वज्र असं केलं. 1999 च्या कारगिल युद्धात या विमानांनी आपली कमाल दाखवली होती.

भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातली मिराज2000 ही सर्वांत विद्ध्वंसक आणि हवी तशी वापरता येईल अशी लढाऊ विमानं आहेत. कारगिल युद्धात या विमानांची उपयुक्तता लक्षात आल्यावर भारताने आणखी 10 विमानं मागवली आणि आता भारताच्या ताफ्यात 50 मिराज आहेत.

F-16 फायटिंग फायटर किंवा वायपर या नावाने ओळखली जाणारी ही लढाऊ विमानं गरजेनुसार हवी तशी वापरता येतात. अमेरिकेच्या व्हिएटनाम आणि कोरिया युद्धानंतर या लढाऊ विमानांची अमेरिकेनं खास निर्मिती केली.

[caption id="attachment_345908" align="aligncenter" width="875"]पाकिस्तानने सोव्हिएत- अफगाण युद्धात या अमेरिकेकडून घेतलेल्या F16 चा निर्णायक वापर केला होता. पाकिस्तानने सोव्हिएत- अफगाण युद्धात या अमेरिकेकडून घेतलेल्या F16 चा निर्णायक वापर केला होता.

[/caption]

फ्रेंच बनावटीची मिराज विमानं या कंपनीने भारताखेरीज इजिप्त, UAE, पेरू, तैवान, ग्रीस आणि ब्राझील या देशांना दिली. या देशांच्या हवाईदलात मिराज विमानं आहेत.

F-16 फाल्कन जगात सर्वाधिक वापरलं जाणारं लढाऊ विमान आहे. पाकिस्तानकडेच अशी 75 फाल्कन जेट आहेत. शिवाय तुर्कस्तान, बेल्जियम, नॉर्वे आणि अर्थातच अमेरिका अशा 25 देशांच्या हवाईदलांमध्ये F16 फाल्कन आहेत.

मिराज2000 ही हलकी आणि वेगवान लढाऊ विमानं आहेत. तर F16 हवेतल्या हवेत लढण्याठीची सर्वोत्तम विमानं आहेत, कारण याची क्षमता अधिक आहे.

F-16 विमानं कुठल्याही हवामानात उडू शकतात आणि दृश्यक्षमता 360 अंशांएवढी आहे, ती इतर कुठल्याही लढाऊ विमानांपेक्षा जास्त आहे. तर मिराज2000 लेसर गायडेड बाँबसाठी आदर्श लढाऊ विमान आहे. म्हणूनच भारताने लक्ष्यभेद करण्यासाठी मिराजचा वापर केला.

भारताकडे मिराजखेरीज सुखोई आणि मिग अशी अत्याधुनिक लढाऊ विमानंही आहेत. राफेल येऊ घातलं आहे. पाकिस्तानी हवाई दलातल्या विमानांपेक्षा ही विमानं अधिक चांगली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या