LIVE India Pak Tensions : भारताने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर आता इम्रान खान यांची पाकिस्तानात प्रेस कॉन्फरन्स

पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारताने प्रत्युत्तर देऊन त्यांचं विमान पाडलं, असं भारतातर्फे अधिकृतपणे सांगण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पत्रकार परिषद घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 04:08 PM IST

LIVE India Pak Tensions : भारताने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर आता इम्रान खान यांची पाकिस्तानात प्रेस कॉन्फरन्स

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : भारतीय वायुदलाने अधिकृतपणे सकाळपासूनच्या हालचालींची माहिती दिल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधानही देशाला उद्देशून निवेदन देणार आहेत. इम्रान खान यांची प्रेस कॉन्फरन्स थोड्याच वेळात सुरू होईल.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी थोड्याच वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सकाळपासूनच्या घडामोडींची माहिती दिली."पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान भारताने पाडले आहे. पाकिस्तानच्या हद्दीत हे विमान पाडले. भारताने मिग21 विमान गमावले आहे." भारताचा एक वैमानिक अद्याप परतलेला नाही. पाकिस्तानने तो त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. आम्ही याचा तपास करत आहोत, असंही रविश कुमार म्हणाले.


आत्तापर्यंत काय काय झालं?

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा भारताचा दावा होता आणि त्यानुसार पाकिस्तानवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला. 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि हे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी मारले असल्याचा भारताचा दावा आहे. यावर पाकिस्तानने हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा बदला घेण्याची भाषा वापरली.

Loading...


'पाकिस्तानचे विमान भारताने पाडले, मिग 21 चा पायलट बेपत्ता'


LIVE India Pak Tensions : सकाळपासून आतापर्यंत काय काय झालं? पाहा 19 महत्त्वाचे अपडेट्स

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

देशभरात हाय अॅलर्ट

उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.

पाकिस्तान घेतोय तेलाचा आढावा

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानात सरकारविरोधात निर्माण झालेला क्षोभ कमी करण्यासाठी पाकिस्तानानी लढाऊ विमानांनी भारतीय हवाई सीमांचं उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने केला. तर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर काय करता येईल यासाठी पाकिस्तानने देशातल्या तेलाच्या साठ्याचा आढावा घेण्याला सुरूवात केली आहे.

पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या तेल कंन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर तेलाचे किती साठे उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भारताकडून हल्ल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लष्कराला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कायम राहावा यासाठी काय करता येईल याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

भारतातली 6 विमानतळं काही काळ बंद आणि नंतर सुरू

उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हाय- अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी विमान सेवा बंद आहेत. इंडिगो, गो एअर कंपनीची विमानं पुन्हा दिल्ली विमानतळावर पाठवण्यात आली. अमृतसर, चंदिगड, लेह, जम्मू, श्रीनगर, देहरादून, धरमशाला आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे.


 पाकिस्तानातील शेअर बाजारात हाहाकार! अवघ्या काही मिनिटांत बुडाले कोट्यवधी रुपये

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी, तेल कंपन्यांच्या प्रमुखांची बोलवली बैठक!


पंतप्रधानांनी सोडला अर्ध्यावर कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सुरू असलेला आपला कार्यक्रम अर्ध्यावरच सोडला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवरच एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी आपला कार्यक्रम सोडून गेल्याची माहिती आहे.

दरम्यान, ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात जाऊन मारलं जातं तर आजच्या परिस्थितीत काहीही शक्य आहे, असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे. भारत आणि पाकस्तानमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला असताना जेटली यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...