S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

India Pak Tension : लग्नाची तयारी झाली, वधू-वरही झाले राजी; तरी यांचं लग्न झालं रद्द

महेंद्र सिंहच्या लग्नासाठी घरात गेले अनेक दिवस लगबग सुरू होती. सगळी तयारी शेवटच्या टप्प्यात होती. त्याच्या घरच्यांनी थर एक्सप्रेसची तिकिटं बुक केली होती. पण आता हे लग्न रद्द झालं आहे. कारण आहे भारत- पाक तणाव. सीमाभागातल्या नागरिकांचं जगणं उलगडणारी एका रद्द झालेल्या लग्नाची गोष्ट...

Updated On: Mar 5, 2019 07:05 PM IST

India Pak Tension : लग्नाची तयारी झाली, वधू-वरही झाले राजी; तरी यांचं लग्न झालं रद्द

जयपूर, 5 मार्च : महेंद्र सिंहच्या लग्नासाठी घरात गेले अनेक दिवस लगबग सुरू होती. सगळी तयारी शेवटच्या टप्प्यात होती. त्याच्या घरच्यांनी थर एक्सप्रेसची तिकिटं बुक केली होती. पण आता हे लग्न रद्द झालं आहे. कारण आहे भारत- पाक तणाव.

महेंद्र सिंहची वधू होती अमरकोटची. अमरकोट येतं पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात. आणि महेंद्र सिंह यांचं गाव आहे राजस्थानातल्या बारमेर जिल्ह्यात. या जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात महेंद्र सिंह यांचं गाव आहे. पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातल्या अमरकोट जिल्ह्यात हे लग्न होणार होतं. अमरकोटमधल्या सिनोई गावची छगन कंवर ही पाकिस्तानची मुलगी भारताची सून बनून येणार होती. आता भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक लग्न रद्द करण्यात आलं आहे.

राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातल्या खेजड का पार या गावातल्या महेंद्र सिंग या तरुणाचं सिंध प्रांतातल्या एका तरुणीशी लग्न होणार होतं. सीमाभागातल्या लोकांना सीमेपार जाण्या - येण्याची सोय व्हावी म्हणून थर एक्स्प्रेस आणि समझौता एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. पण या ट्रेनचा प्रवाससुद्धा गेल्या काही काळात अनिश्चित झाला आहे.


महेंद्रसिंगच्या लग्नासाठी त्याच्या घरच्यांनी थर एक्सप्रेसची तिकिटं बुक केली होती. अमरकोटमधल्या सिनोई गावची छगन कंवर ही पाकिस्तानची मुलगी भारताची सून बनून येणार होती.

पण नवरदेवाला घेऊन जाणारी ट्रेन भारतातून पाकिस्तानात जाऊच शकली नाही. ही ट्रेन दर सोमवारी आणि गुरुवारी भारतातल्या अट्टारीमधून पाकिस्तानमधल्या लाहोरला जाते. पण  भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या स्थितीमुळे पाकिस्तानने या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केल्या.

एवढंच नाही तर महेंद्र सिंह आणि त्यांच्या नातेवाईकांना पाकिस्तानचा व्हिसा मिळण्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे लग्नासाठी केलेली सगळी तयारी वाया गेली, असं त्याने सांगितलं.

भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावामुळे सीमेवरच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचं दैनंदिन जीवनही विस्कळित झालं आहे. त्यासोबतच या रहिवाशांना समारंभही पुढे ढकलावे लागत आहेत. म्हणूनच दोन देशांमधला तणाव लवकर निवळावा, अशी अपेक्षा या रहिवाशांनी व्यक्त केली आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 07:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close