पाकिस्तानमधून शेतकऱ्यांवर ‘टोळधाड’; भारताची चिंता वाढली

India - Pakistan Relation : पाकिस्तानमधून येणाऱ्या संभाव्य टोळधाडीमुळे आता सीमेलगत असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 01:38 PM IST

पाकिस्तानमधून शेतकऱ्यांवर ‘टोळधाड’; भारताची चिंता वाढली

नवी दिल्ली, 21 जून : पाकिस्तान सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. 26 वर्षानंतर येणाऱ्या या संकटामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण, टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते. पाकिस्तानमधून येणाऱ्या या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रश्नावर भारतानं पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बुधवारी चर्चा देखील केली. जवळपास 4 तास या बैठकीमध्ये चर्चा झाली. 1993मध्ये अशाच प्रकारची टोळधाड पडली होती. त्यानंतर आता शेतकऱ्यांना टोळधाडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तान सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सरकार देखील आता या समस्येशी सामना कसा करायचा यावर विचार करत आहे.

पाकिस्तानमध्ये टोळांची समस्या

पाकिस्तानमध्ये देखील टोळांचा उपद्रव वाढला आहे. त्यांच्या नियंत्रण मिळवण्यासाठी विमानातून औषध फवारणी करण्यात आली. शिवाय, गरज पडल्यास आणखी एक विमान सज्ज ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर ही टोळधाड आता भारताच्या वाटेवर आहे. त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी भारतानं चर्चा केली. 4 तास चाललेल्या चर्चेअंती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.

भारत चिंतेत

मान्सून दाखल होण्यापूर्वी पाऊस आणि वादळी – वाऱ्यामुळे भारत चिंतेत आहे. हवेचा रोख पाहता टोळ राजस्थानकडे जाऊ शकतात. पण, भारतानं या संकटाचा सामना करण्यासाठी आता तयारी केली आहे. 1993मध्ये आलेल्या टोळधाडीनंतर हे मोठं संकट मानलं जात आहे.

Loading...

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून थार मरूस्थल प्रदेशात आता ही टोळधाड पोहोचली आहे.

VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...