मराठी बातम्या /बातम्या /देश /

चिंता वाढली! काश्मीरनंतर आता गुजरात सीमेवर चीन आणि पाकिस्तानने केलं कारस्थान

चिंता वाढली! काश्मीरनंतर आता गुजरात सीमेवर चीन आणि पाकिस्तानने केलं कारस्थान

पाकिस्तानच्या कुरापती एवढे दिवस काश्मीर सीमेवर सुरू असायच्या, पण आता त्यांनी गुजरातकडे मोर्चा वळवला आहे आणि त्यासाठी चीनला (India china) बरोबर घेऊन भारताला आव्हान दिलं आहे.

पाकिस्तानच्या कुरापती एवढे दिवस काश्मीर सीमेवर सुरू असायच्या, पण आता त्यांनी गुजरातकडे मोर्चा वळवला आहे आणि त्यासाठी चीनला (India china) बरोबर घेऊन भारताला आव्हान दिलं आहे.

पाकिस्तानच्या कुरापती एवढे दिवस काश्मीर सीमेवर सुरू असायच्या, पण आता त्यांनी गुजरातकडे मोर्चा वळवला आहे आणि त्यासाठी चीनला (India china) बरोबर घेऊन भारताला आव्हान दिलं आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : भारताविरुद्ध कुरापाती करण्यात चीन आणि पाकिस्तान कायमच गुंतलेले असतात. पाकिस्तानच्या कुरापती एवढे दिवस काश्मीर सीमेवर सुरू असायच्या, पण आता त्यांनी गुजरातकडे मोर्चा वळवला आहे. नुकतंच गुजरातलगतच्या पाकिस्तानी सीमेजवळ चिनी आणि पाकिस्तानी सैन्याने  एकत्र युद्धसराव (China-Pakistan Military Drill) केला. हा भारताला दिलेला अप्रत्यक्ष इशारा आहे. त्यामुळे भारताला सावध व्हायला हवं असं संरक्षणविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पाकिस्तानात संयुक्त लष्करी सराव

पाकिस्तानचा सिंध (Pakistan Sindh) प्रांत आपल्या गुजरातला लागून आहे. या सिंध प्रांतातील कराची (Karachi) शहराच्या ईशान्येला भोलारी भागात चीन आणि पाकिस्तानी हवाईदलांनी (Air force) संयुक्त सराव सुरू केला आहे. शाहीन (चील) – 9  (Shaheen) असं या संयुक्त अभ्यासाचं नाव असून तो डिसेंबरअखेरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांच्या सैन्याला प्रत्यक्ष युद्ध प्रशिक्षणात (Actual Combat training) कुशल करणं हा या अभ्यासाचा उद्देश असल्याचं चिनी अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

भारत-चीन तणाव असताना सराव

चीनचं सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सनी याबाबत म्हटलंय,  ‘कोविड 19  (Covid-19)महामारीच्या काळात संयुक्त लष्करी सराव केल्याने चीन आणि पाकिस्तानमधील घट्ट मैत्रीचं दर्शन जगाला घडत आहे. ’ लडाखमधील सीमेवर भारत-चीनमध्ये (Indo-China tension) तणाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या तणावादरम्यान उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चा झाल्या आहेत तरीही हा तणाव अद्याप निवळलेला नाही. दुसरीकडे 2019 मध्ये भारत सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं 370 वं कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानसोबत असलेल्या तणावात भर पडली आहे. त्याआधीपासून पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत असल्याने काश्मीर खोऱ्यात तणाव आहेच. अशा स्थितीत ही दोन्ही शत्रूराष्ट्र संयुक्त लष्करी सराव करत असल्याने भारतासाठी चिंतेची बाब आहे.

चिनी सैन्याचं काय म्हणणं आहे?

चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीने (People’s Liberation Army) या सरावाबाबत पत्रकाद्वारे वक्तव्य केलं आहे. ‘या सरावामुळे चीन आणि पाकिस्तानमधील सैनिकी संबंध वृद्धिंगत होतील, दोन्ही देशांच्या वायूदलांतील सहकार्य वाढेल त्यामुळे प्रत्यक्ष युद्धावेळीच्या प्रशिक्षणाचा उत्तम सराव होईल. ’ या सरावात सहभागी होणाऱ्या विमानांची संख्या किंवा इतर कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. ओपन सोर्स इंटिलिजन्स ट्विटर हँडल @detresfa_ नी प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये Y20 हेवी लिफ्ट (Heavy Lift Plane) प्लेन दिसत आहेत. त्याचबरोबर भोलारी एअरबेसच्या दिशेने आणखी एक अज्ञात विमान येताना या फोटोत दिसत आहे.

सरावातील विमानांची क्षमता काय?

चिनी सैन्याकडे असलेल्या सर्वांत मोठ्या विमानापैकी Y20 हे एक विमान आहे. रणगाडे, सैन्याच्या तुकड्या आणि रसद नेण्यासाठी या विमानांचा वापर होतो. चीनचा सर्वांत मोठा रणगाडा ZTZ 99 (Tank) या विमानातून नेता येतो. हे विमान 40 टनांचा कार्गो 4850 मैलांपर्यंत घेऊन जाऊ शकतं. भारत आणि चीनच्या सीमेजवळ 2019 मध्ये शाहीन युद्ध सराव झाला होता. त्यात दोन्ही देशांची सुमारे 50 विमानं सहभागी झाली होती. हे देश नवव्यांदा एकत्र युद्धसराव करत असून भारतासोबत तणावाची परिस्थिती असली तरीही हा सराव थांबवला जाणार नाही असं चीनचं म्हणणं आहे. या अभ्यासामुळे पाकिस्ताना वायुदलाला शक्ती मिळेल असं भारतीय संरक्षणतज्ज्ञांचं मत आहे.

First published:

Tags: Gujrat, India china, Pakistan