तणावपूर्ण परिस्थितीमुळे राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय

तणावपूर्ण परिस्थितीमुळे राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय

भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण तयार झालं आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या घडमोडी घडत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण तयार झालं आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या घडमोडी घडत आहेत. अशातच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यसमितीची बैठक आणि त्यांच्या काही दिवसांच्या सभा रद्द केल्या आहेत.

अहमदाबा मध्ये होणारी काँग्रेस कार्यसमितीची बैठक काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. यासंदर्भात लवकरच विस्तारित पणे माहिती देण्यात येणार आहे. देशातील तणावाची परिस्थिती लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवसातील मोठ्या घडामोडी

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.


VIDEO : प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'नरेंद्र मोदींसमोर ही आहे संधी'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या