पाकिस्तानच्या ताब्यातील पायलट लवकरच भारतात येणार : सूत्र

पाकिस्तानच्या ताब्यातील पायलट लवकरच भारतात येणार : सूत्र

याबाबत भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : 'पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाची लवकरच सुटका होणार आहे,' अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

'परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

भारताची मागणी

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विंग कमांडरची तातडीने आणि सुरक्षित सुटका करावी अशी मागणी भारताने नुकतीच केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावरही परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा त्या विमानाचा पायलट होता. विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.

जखमी अवस्थेतल्या अभिनंदन याचे व्हिडीओ पाकिस्तानी माध्यमांनी आणि लष्कराने व्हायरल केले होते. आंतरराष्ट्रीय करारानुसार अशा पायलटला योग्य वागणूक दिली जावी असा नियम आहे. त्याला संबंधीत देशाच्या स्वाधीन करावं असंही त्या करारामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे ती मागणी केली आहे.

VIDEO : जवानांच्या शौर्याचं श्रेय कुणीही घेता कामा नये - उद्धव ठाकरे

First Published: Feb 28, 2019 09:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading