भारतीय पायलट अभिनंदन यांच्याबाबत मोठी बातमी, पाकिस्तान तडजोडीला तयार

भारतीय पायलट अभिनंदन यांच्याबाबत मोठी बातमी, पाकिस्तान तडजोडीला तयार

'पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकतांचा आदर करतो'

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान हे भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 'भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलानं तडजोड करायला तयार आहे,' असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

'भारतीय वैमानिक आमच्याकडे सुरक्षित आहे. पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकेतांचा आदर करतो,' असं शाह मेहमूद यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी याआधी केलं होतं. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

भारताची मागणी

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय विंग कमांडरची तातडीने आणि सुरक्षित सुटका करावी अशी मागणी भारताने नुकतीच केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावरही परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

Loading...

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा त्या विमानाचा पायलट होता. विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.


VIDEO : राहुल गांधींनी मोदींबद्दल व्यक्त केली 'ही' नाराजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...