S M L

भारत-पाक यांच्यात तणाव, काँग्रेसने देशवासीयांना केलं विशेष आवाहन

दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ट्विटरद्वारे एक आवाहन केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 04:55 PM IST

भारत-पाक यांच्यात तणाव, काँग्रेसने देशवासीयांना केलं विशेष आवाहन

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ट्विटरद्वारे एक आवाहन केलं आहे.

'तणाव वाढल्याने द्वेष आणि खोट्या बातम्या पसरवणं सोपं झालं. जोपर्यंत भारत सरकारकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया देताना आणि एखादी गोष्ट सोशल मीडियावर शेअर करताना संयम दाखवा,' अशा आशयाचं ट्वीट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.



Loading...

आत्तापर्यंत काय काय झालं?

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा भारताचा दावा होता आणि त्यानुसार पाकिस्तानवर कारवाईचा दबाव वाढवण्यात आला. 26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि हे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी मारले असल्याचा भारताचा दावा आहे. यावर पाकिस्तानने हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचा बदला घेण्याची भाषा वापरली.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

'आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.

भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

देशभरात हाय अॅलर्ट

उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.

VIDEO: 'पाकिस्तानला शांततेची नव्हे, शक्तीचीच भाषा कळते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 04:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close