Home /News /national /

भारत 5Gच्या उंबरठ्यावर, टेक्नोलॉजीमध्येही ठरणार जगात अव्वल – मुकेश अंबानी

भारत 5Gच्या उंबरठ्यावर, टेक्नोलॉजीमध्येही ठरणार जगात अव्वल – मुकेश अंबानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल भारताचं स्वप्न Jio पूर्ण करेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

    मुंबई 31 जुलै: भारतात मोबाईलच्या आगमनाला 25 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात रिलायन्स समुहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी व्हिडीओकॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे दिल्लीतून सहभागी झाले होते. मोबाईलचा 25 वर्षांचा प्रवास हा देशासाठी अतिशय महत्त्वाचा असून भारत हा 5Gच्या उंबरठ्यावर आहे, टेक्नोलॉजीमध्येही जगात अव्वल ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंकेश अंबानी म्हणाले, 1995मध्ये भारतात मोबाईलचा प्रवास सुरु झाला आणि एका क्रांतीला सुरुवात झाली. आज त्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली आहे. मोबाईलचं जेव्हा आगमन झालं त्यावेळी एका फोन कॉलसाठी 24 रुपये द्यावे लागत होते. 16 रुपये करणाऱ्यांना आणि 8 रुपये फोन कॉल घेण्याऱ्यांना द्यावे लागत असे. आजची स्थिती पाहिली तर त्यावर विश्वास बसणार नाही. देश ही झेप घेत असतांना अनेक चढ उतार आलेत मात्र आलेख हा कायम वरच चढत राहिला. मोबाईल हा कधी काळी श्रीमंतांचीच मक्तेदारी होता. त्याची किंमत स्वस्त झाल्याने तो सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्यामुळे देशातली लोकशाही मजबूत झाली असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल भारताचं स्वप्न Jio पूर्ण करेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. मोबाईल हे आता फक्त संपर्काचं माध्यमच राहिलं नाही तर माणसांच्या आयुष्यात त्याने मुल्यवृद्धी केल्याचंही त्यांनी सांगितलं. लोक आता फोन्सच्या माध्यमातूनच बातम्या बघतात, व्हिडीओ बघतात, खरेदी करतात, पेमेंट करतात ही मोठी क्रांती आहे. कोविडची साथ आल्यानंतर फोन्सचा किती उपयोग होते हे कळून आलं. त्यामुळे माणसांना एक नवी ताकद दिली असंही ते म्हणाले. 2G हा इतिहास होणार असून 5Gच्या उंबरठावर भारत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारत जगात अव्वल ठरेल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Mukesh ambani, Reliance

    पुढील बातम्या