• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मोठी बातमी: ब्रिटनची COVISHIELD ला मान्यता नाहीच, भारताकडून तीव्र आक्षेप

मोठी बातमी: ब्रिटनची COVISHIELD ला मान्यता नाहीच, भारताकडून तीव्र आक्षेप

भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता न (Britain does not recognize Covishield vaccine) देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारनं घेतला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता न (Britain does not recognize Covishield vaccine) देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारनं घेतला आहे. याला भारत सरकारनं आक्षेप घेत (Government of India objects Britain government's decision) नाराजी नोंदवली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign affairs Minister S. Jaishankar) यांनी कोव्हिशिल्डला मान्यता न देण्याच्या ब्रिटनच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून हा भारतीय नागरिकांवर अन्याय करण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. काय आहे प्रकरण ब्रिटन सरकारनं कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनादेखील ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ, कोव्हिशिल्डचे दोन्ही लस घेतलेली व्यक्ती ही ब्रिटनच्या लेखी लस न घेतलेल्या व्यक्तीप्रमाणेच असणार आहे. त्यामुळे भारतातून कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनादेखील ब्रिटनमध्ये सक्तीचं क्वारंटाईन सहन करावं लागणार आहे. सुरक्षेसाठी निर्णय घेतल्याचा दावा ब्रिटननं मान्यता दिलेल्या लसींच्या यादीत कोव्हिशिल्डचा समावेश केलेला नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश जरी मिळणार असला, तरी त्यांना 10 दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोव्हिशिल्डला आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. जगातील बहुतांश देशांनी कोव्हिशिल्डला मान्यता दिली आहे. मात्र ब्रिटननं नवे नियम तयार केले असून त्यातून कोव्हिशिल्डला वगळण्यात आलं आहेत. ब्रिटनमध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी अनेक भारतीय जात असतात. त्यांना ब्रिटन सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. हे वाचा - पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू मुलगी झाली ऑफिसर भारताने नोंदवला आक्षेप ब्रिटन सरकारचा हा निर्णय भेदभाव करणारा असल्याची प्रतिक्रिया भारत सरकारनं दिली आहे. भारतानं आक्षेप नोंदवल्यानंतर ब्रिटनकडून त्याची दखल घेण्यात आली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे. ब्रिटनच्या नव्या परराष्ट्र सचिवांशी याबाबत भारत सरकारने चर्चा केली असून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे. आता ब्रिटनकडून हा निर्णय़ कधी बदलला जातो आणि कोव्हिशिल्डला किती लवकर ब्रिटन मान्यता देतं, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.
  Published by:desk news
  First published: