'PM मोदींना न घाबरता चर्चा करेल, अशा नेत्याची देशाला गरज'; BJPच्या दिग्गज नेत्याचं विधान

भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 01:44 PM IST

'PM मोदींना न घाबरता चर्चा करेल, अशा नेत्याची देशाला गरज'; BJPच्या दिग्गज नेत्याचं विधान

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'पंतप्रधानांसोबत जो निर्भयपणे बोलू शकेल,  जो तत्त्वांच्या आधारे पंतप्रधानांशी चर्चा करेल तसंच कोणतीही चिंता न करता आपले विचार व्यक्त करू शकेल,अशा नेत्याची देशाला आवश्यकता आहे',असे विधान मुरली मनोहर जोशी यांनी केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत बोलत असताना मुरली मनोहर जोशी यांनी हे विधान केलं.

या शोकसभेत बोलताना जोशी म्हणाले की, 'निर्भिडपणे आपले विचार व्यक्त करेल अशा नेत्याची देशाला गरज आहे. त्यानं मांडलेले विचार ऐकून पंतप्रधान खूश होतील की नाराज? याची चिंता त्याला नसावी'.

(वाचा : फडणवीस आणि मोदी नाही...उदयनराजेंच्या मते हे लोक आहेत खरे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान)

काँग्रेसचे नेते जयपाल रेड्डी यांचं हैदराबादमध्ये 28 जुलैला निधन झालं होतं. 90च्या दशकातील त्यांच्यासोबतच्या आठवणींना जोशींनी यावेळेस उजाळा दिला. जोशी म्हणाले की,'रेड्डी आपल्या अखेरच्या काळातही आपले विचार, मतं व्यक्त करत होते. त्यांनी प्रत्येक स्तरावर आपलं मत मांडलं असून आपल्या मुद्यांसोबत कधीही तडजोड केली नाही'

जयपाल रेड्डींच्या शोकसभेमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उप राष्ट्रपती व्यकंय्या नायडू, सीपीएम नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

Loading...

(वाचा : मुंबईकरांनो सावधान! पुढील दोन दिवस बरसणार मुसळधार पाऊस)

SPECIAL REPORT: रिअल हिरो अभिनंदन यांचा नवा जोश, नवा लूक पाहिलात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...