प्रियांका गांधींवर टीका करायला मोदींनी वापरला नेहरूंचा 'तो' फोटो

प्रियांका गांधींवर टीका करायला मोदींनी वापरला नेहरूंचा 'तो' फोटो

आता जवाहरलाल नेहरूंचा फोटो वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. यावेळी त्या समाजातील सर्व घटकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहेत. 02 मे रोजी प्रियांका गांधी रायबरेली दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी गारूड्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांचा साप हातळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता प्रियांका गांधी – वाड्रा यांच्यावर देश पुढे निघून गेला. पण, गांधी कुटुंब मात्र भूतकाळात अडकलं असल्याची टीका केली आहे. त्यासाठी त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोचा देखील उल्लेख केला आहे.

नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या जवाहरलाल नेहरूंच्या फोटोमध्ये देखील एक गारूडी आहे. त्या फोटोमध्ये अमेरिकेची फर्स्ट लेडि जॅकलीन कनेडी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि विजया लक्ष्मी पंडित दिसत असून सर्वजण गारूड्याचा खेळ पाहत आहेत. याच फोटोच्या आधारे प्रियांका गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे.

Jawahar

यापूर्वी देखील नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

आणखी काय म्हणाले नरेंद्र मोदी

शिकर येथे जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पाणी सोडण्याचा मुद्यावरून देखील काँग्रेसला लक्ष्य केलं. पाकिस्तानचं पाणी रोखण्याची हिंम्मत यावेळी काँग्रेसनं दाखवली नाही. शिवाय, फाळणीनंतर जे लोक पाकिस्तानमध्ये गेले त्यांची संपत्ती देखील मतांकरता जप्त करण्यात आली नव्हती. असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषमामध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी अभिनंदन या शब्दाचा उल्लेख करत आता आचारसंहितेचा भंग झाला असं म्हणत निवड़णूक आयोगाकडे जा असा टोला काँग्रेसला लगावला.

टोल नाक्यावर माकडाचा डल्ला, VIDEO व्हायरल

First published: May 4, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading