आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हायची शक्यता; या 3 देशांत भारतातून लवकरच जाऊ शकतात फ्लाइट्स

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हायची शक्यता; या 3 देशांत भारतातून लवकरच जाऊ शकतात फ्लाइट्स

1 जुलैला भारताने परदेशातली विमानसेवा बंद करून बरोबर 100 दिवस झाले. COVID-19 च्या परिस्थितीत परदेशातून विमानं सुरू करण्यासाठी फक्त त्या त्या देशांतलेच नव्हे आपल्या राज्यांचेही नियम विचारात घ्यावे लागणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 जुलै : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरू करण्यासंदर्भात भारताकडून बोलणी सुरू झाली आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मध्यपूर्वेकडे विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती भारताच्या एअरपोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष अरविंद सिंग यांनी दिली.

1 जुलैला भारताने परदेशातली विमानसेवा बंद करून बरोबर 100 दिवस झाले. आता आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याविषयीची चर्चा अखेरच्या टप्प्यात आहे. पण भारतातही प्रत्येक राज्यात सध्या क्वारंटाईन आणि इतर नियम वेगवेगळे असल्याने बाहेरचे देश आणि देशांतर्गत राज्य या दोन्ही बाजूंनी चर्चा होणं अपेक्षित आहे.

अरविंद सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, कॅनडा आणि UAE यांच्याशी चर्चा पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे. कदाचित याच महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत सुरू होईल.

मोदी सरकारच्या या योजनेमुळे 20.41 लाख जणांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये

गेल्याच आठवड्यात युरोपीय महासंघाने (European Union) आंतरराष्ट्रीय प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आणि काही देशांतून विमानसेवेला परवानगी दिली. पण या परवानगी मिळालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही. ही यादी दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा नव्याने तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे PHOTOS

सिंग म्हणाले की, 'देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांकडून विमानसेवा सुरळीत करण्याची मागणी सातत्याने होत आहेत. ते सध्या ज्या देशात राहात आहेत, त्यांच्याकडूनही अशी परवानगी मिळणं त्यासाठी आवश्यक आहे. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत.'

CNBC ने दिलेल्या बातमीनुसार, काही देशांच्या मते, भारतीय विमानतळांवर COVID-19 च्या नियमांपेक्षा जास्त गर्दी असते. त्यामुळे त्यांनी भारतात विमान सेवा सुरू करण्याची अद्याप तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळे कदाचित ठराविक शहरांतूनच विमानसेवा सुरू करण्याविषयी चाचपणी सुरू आहे.

 

First published: July 3, 2020, 1:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading