Mission Paani Waterthon LIVE : अबीद सुर्ती यांना अक्षय कुमारने दिला जलयोद्धा पुरस्कार

Mission Paani: पाणी अमूल्य आहे आणि त्याची बचत करणं अत्यंत गरजेचं आहे याच उद्देशाने News18 आणि हार्पिक इंडिया यांनी मिशन पानी अंतर्गत 8 तासांचं Waterthon आयोजित केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार या मोहिमेचं नेतृत्व करत आहे.

 • News18 Lokmat
 • | January 26, 2021, 16:09 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:11 (IST)

  शेतकऱ्यांच्या मुंबई आंदोलनात महाविकास आघाडीकडून शरद पवार स्वतः त्या ठिकाणी होते, मुख्य म्हणजे राज्यपालांना भेटायला ते आले होते आणि राज्यपाल नव्हते -आदित्य ठाकरे

  22:9 (IST)

  जे शेतकरी अन्नदाता आहेत त्यांचा संयम सुटला, का सुटला, कोणी वेगळं होतं का त्यात, हा वेगळा मुद्दा, हे आंदोलन का चिघळलं  याचा विचार करायला हवा -आदित्य ठाकरे

  22:9 (IST)

  शेतकरी असो वा कोणताही घटक, मागण्या घेऊन कोणी बसतं तेव्हा त्या मागण्या काय आहेत हे ऐकून घ्यावं, संवाद साधणं गरजेचं होतं -आदित्य ठाकरे

  22:9 (IST)

  अराजकतेच्या जवळ आपण चाललो आहोत का? कोणी ढकलत आहे का? याचा विचार करायला हवा, कोणी हा वाद चिघळवला? हाही विचार करायला हवा, सत्य बाहेर येणं गरजेचं -आदित्य ठाकरे

  21:48 (IST)

  देशात आतापर्यंत 20 लाख 39 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण, मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

  21:33 (IST)

  पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
  29 तारखेपासून पश्चिम रेल्वेवर सर्व फेऱ्या सुरू
  सध्या पश्चिम रेल्वेवर 1201 लोकल फेऱ्या
  29 तारखेपासून लोकल फेऱ्या 1367 होणार
  सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची पूर्वतयारी?

  19:29 (IST)

  नाशिक - जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा उद्यापासून होणार सुरू, नाशिक शहर आणि जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या एकूण 2825 शाळा

  19:16 (IST)

  'शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज फुटला'
  दिल्लीतील सरकार असंवेदनशील -भुजबळ
  कायद्याचा फेरविचार केला पाहिजे -भुजबळ
  'जास्त अंत न पाहता पंतप्रधानांनी लक्ष घालावं'
  हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नाही -भुजबळ
  'पंजाब, हरियाणातील लोकांमुळे धान्य मिळतं'
  'सीमेवर जीव मुठीत धरून जवानांकडून रक्षण'

  18:56 (IST)

  शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

  18:56 (IST)

  दिल्ली - शेतकरी आंदोलनातील हिंसा प्रकरण
  केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वपूर्ण बैठक
  कायदा-सुव्यवस्थेचा अमित शाहांकडून आढावा
  दिल्लीत सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक तैनात

  Mission Paani: पाणी अमूल्य आहे आणि त्याची बचत करणं अत्यंत गरजेचं आहे याच उद्देशाने News18 आणि हार्पिक इंडिया यांनी मिशन पानी अंतर्गत 8 तासांचं Waterthon आयोजित केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार या मोहिमेचं नेतृत्व करत आहे.