Home /News /national /

Fact Check: दिवाळीपर्यंत बंद राहणार रेल्वे? पुन्हा लागणार लॉकडाउन? काय आहे सत्य?

Fact Check: दिवाळीपर्यंत बंद राहणार रेल्वे? पुन्हा लागणार लॉकडाउन? काय आहे सत्य?

नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध? (File Photo)

नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध? (File Photo)

देशातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे उद्या सकाळपासून देशात पुन्हा एकदा लॉकडाउन (Lockdown in country viral message) लागू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत सर्व मार्गांवरच्या रेल्वेगाड्या बंद राहणार आहेत, असा मेसेज तुम्हाला आला असेल तर... आधी हे वाचा

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: आपण पाहतो, की बऱ्याच वेळा सरकारच्या एखाद्या निर्णयाची माहिती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळते. एखाद्या बातमीचा स्क्रीनशॉट किंवा लिंक आदींसोबत हे संदेश फॉरवर्ड (Viral message) केले जातात. सध्या तुम्हालाही कदाचित व्हॉट्सअॅपवर असा मेसेज आला असेल, की सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन (Third lockdown viral message) लागू केला आहे. तसंच, दिवाळीपर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद (Trains stopped till Diwali Viral message) राहणार असल्याचाही मेसेज तुम्ही पाहिला असेल; पण या मेसेजवर (Fake news about lockdown) विश्वास ठेवू नका. कारण सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाहीये. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact check) या दाव्यातली सत्यता पडताळून ही माहिती दिली आहे. देशातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे उद्या सकाळपासून देशात पुन्हा एकदा लॉकडाउन (Lockdown in country viral message) लागू करण्यात येणार आहे. तसंच, दिवाळीपर्यंत देशातल्या सर्व मार्गांवरच्या रेल्वेगाड्या बंद राहणार आहेत, अशी माहिती देणारा एक संदेश सध्या व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमांतून फिरतो आहे. हे दोन्ही दावे खोटे असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact check twitter) आपल्या ट्विटर हँडलवरून स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकनं म्हटलं आहे. पीआयबीने फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये काही स्क्रीनशॉट्सही दिले आहेत. यातल्या एका स्क्रीनशॉटमध्ये भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉटही (Lockdown in country viral screenshot) दिला आहे, ज्यात ‘तीसरी लहर खतरनाक, कल सुबह से लॉकडाउन’ असं लिहिलेलं दिसून येत आहे. यासोबत वृत्तवाहिनीच्या स्क्रीनवर ‘एका दिवसात सात लाख कोरोना रुग्ण आढळले’ आणि ‘दिवाळीपर्यंत देशातल्या सर्व रेल्वे सेवा बंद’ अशा आशयाचा मजकूरही दिसून येत आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या स्क्रीनशॉटवर लाल रंगात ‘फेक’ असा शिक्का मारून हे खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. पीआयबी फॅक्ट चेक ही संस्था सरकारी निर्णयांबाबत किंवा योजनांबाबत पसरवण्यात येणारी माहिती तपासून पाहते. तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर असा एखादा संदेश आला असेल, तर तो पुढे पाठवू नका. GOOD NEWS! आर्थिक सुधारणांचा वेग कोरोनापूर्व काळाएवढा असे खोट्या माहितीवर आधारित संदेश तात्काळ डिलीट (Delete messages with fake news) करणंच तुमच्या फायद्याचं आहे. तुम्हाला आलेला संदेश खरा आहे की खोटा याबाबत तुम्हाला साशंकता असेल, तर पीआयबी फॅक्ट चेकला तुम्ही याबाबत माहिती देऊ शकता. यासाठी तुम्ही ती माहिती 918799711259 या क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in या ईमेल आयडीवर पाठवू शकता. सध्या अशा प्रकारची खोटी माहिती पसरवणाऱ्या संदेशांचं प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोणताही संदेश फॅक्ट चेक केल्याशिवाय पुढे पाठवण्याची चूक तुम्ही करू नका. स्वतःही सतर्क राहा आणि दुसऱ्यांनाही योग्य माहिती द्या!
First published:

Tags: Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या