खाकी वर्दीतली माणूसकी जिवंत आहे, पोलीस अधिकाऱ्याचा हा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

खाकी वर्दीतली माणूसकी जिवंत आहे, पोलीस अधिकाऱ्याचा हा VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

एवढ्यावरच तो थांबला नाही तर संध्याकाळी आणखी जेवण देणार असल्याचं त्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली 25 मार्च : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. यामुळे सगळ्यात हाल होत आहेत ते हातावर पोट असणाऱ्या लोकांचे आणि रस्त्यावर राहणाऱ्यांचे. रस्त्याव फिरणाऱ्या लोकांना घरी पाठविण्यासाठी प्रसंगी पोलीस लाठ्यांचा प्रसाद देतात. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र पोलिसांमधल्या माणसाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तो ह्रदयाला पाझर फोडणारा आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर राहणाऱ्या दोन वृद्ध भिकाऱ्यांना जेवण दिलं. हा पोलीस अधिकारी पाणी आणि जेवण त्यांच्या जवळ घेऊन आला. त्या दोघांनाही हात स्वच्छ धुण्यास पाणी दिलं आणि जेवण दिलं. एवढ्यावरच तो थांबला नाही तर संध्याकाळी आणखी जेवण देणार असल्याचं त्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं. सोशल मीडियावर त्या अधिकाऱ्याचं कौतुक होतं आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संचारबंदी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र असं असलं तरीही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात सकाळी कोरोनाचे 5 रुग्ण आढळल्यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 116 वर गेला आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सकाळी समोर आली आहे. त्यातच आता मुंबईत आणखी 4 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

वाचा - Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? छोट्या घरात राहणाऱ्यांना पडलेत प्रश्न

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. आपल्या देशातून कोरोनाला पळवून लावण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आला.

वाचा -

सावधान! तुमच्या आजूबाजूला असू शकतो कोरोना रुग्ण, लक्षणं न दिसताच पसरवतोय व्हायरस

आयसोलेशन वॉर्डमधील भीतीदायक 12 दिवस, कोरोनाची लढाई जिंकलेला रुग्ण म्हणाला...

First published: March 25, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading