• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • लडाखबाबत सहमती, मात्र चीनवर विश्वास नाही; मोदी सरकार करतंय मोठ्या युद्धाची तयारी

लडाखबाबत सहमती, मात्र चीनवर विश्वास नाही; मोदी सरकार करतंय मोठ्या युद्धाची तयारी

लडाखमधील (Ladakh) गोगरा पेट्रोलिंग पॉइंटवरून (Gogra patrolling point) सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये (India and China) सहमती झाली असली, तरी भारताचा चीनवर विश्वास नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : लडाखमधील (Ladakh) गोगरा पेट्रोलिंग पॉइंटवरून (Gogra patrolling point) सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये (India and China) सहमती झाली असली, तरी भारताचा चीनवर विश्वास नाही. त्यामुळे या कराराचं पालन करतानाच दीर्घ युद्धाला (War) सामोरं जाण्याची तयारीदेखील मोदी सरकार (Modi Government) करत असल्याचं समजतं आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा असताना चीनवर पूर्ण विश्वास न ठेवण्याचं धोरण सरकारनं अंगिकारलं आहे. लडाखमध्ये मोठ्या लढाईची तयारी चीननं वारंवार आपला शब्द फिरवत विस्तारवादी धोरणाचा अवलंब केला आहे. त्याशिवाय चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात बांधकामं करत असल्याचंही वारंवार दिसून आलं आहे. त्यामुळे कमांडर स्तरावरील चर्चेच्या 12 व्या फेरीत चीनकडून सैन्याची माघारीची आणि शांततेची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र चीनकडून कुरापती काढल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनविरुद्ध सदासर्वकाळ सतर्क राहण्याचे धोरण भारत सरकारनं अवलंबल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. हे पाहा -जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण चीनच्या तयारीचा अंदाज चीननं आपलं आक्रमक धोरण कायम ठेवल्याचं यापूर्वी वारंवार सिद्ध झालं आहे. काही महिन्यांपूर्वी हाती आलेल्या सॅटेलाईट फोटोनुसार चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत खंदक खोदल्याचं दिसून आलं होतं. त्याचप्रमाणं या भागात खड्डे खणून मिसाईल गाडून ठेवल्याचंही दिसून आलं होतं. याच भागात चीननं आपला एअरबेसही तयार केल्याचं दिसून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सर्व प्रकारच्या हल्ल्यांना उत्तरं देण्याची तयारी करत असून कुठल्याही परिस्थितीत गाफील न राहण्याचा आदेश सैन्यदलांना देण्यात आल्याचं समजतं आहे. चीननं आपलं आश्वासन पूर्ण करून सैन्य पूर्णतः माघारी घेतल्याशिवाय द्विपक्षीय व्यापारी संबंधांना चालना मिळणार नसल्याचे संकेतही केंद्र सरकारने दिले आहेत.
  Published by:desk news
  First published: