Home /News /national /

Corona लसीच्या क्षेत्रात भारताची Super Power च्या दिशेनं वाटचाल, 96 टक्के लोकसंख्येनं घेतला पहिला डोस

Corona लसीच्या क्षेत्रात भारताची Super Power च्या दिशेनं वाटचाल, 96 टक्के लोकसंख्येनं घेतला पहिला डोस

Corona vaccine: डॉ. भार्गव म्हणाले की, मेसेंजर आरएनए (MRNA) लसीच्या क्लिनिकल चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच ही लस भविष्यात इतर आजारांच्या उपचारांसाठीही वापरली जाऊ शकते.

    नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: भारत कोरोना लस (Corona vaccine) विकसित आणि निर्मिती क्षेत्रात जगातील सुपर पावर बनण्याच्या जवळपास आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research, ICMR) चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत देशातील 96 टक्के लसीकरण झालेल्या लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 75 टक्क्यांहून अधिक लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत. डॉ. भार्गव म्हणाले की, मेसेंजर आरएनए (MRNA) लसीच्या क्लिनिकल चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच ही लस भविष्यात इतर आजारांच्या उपचारांसाठीही वापरली जाऊ शकते. आपल्या संस्थांचे काम पाहिलं तर आपण लवकरच लसीची महासत्ता होऊ असे म्हणण्यात शंका नाही. लसीद्वारे आपण इतर आजारांना प्रतिबंध करू शकतो. ICMR चे प्रमुख म्हणाले, मोठ्या संख्येनं लोकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी उत्साह दाखवला, ज्याचा परिणाम म्हणून आम्ही कोविड महामारीची तिसरी लाट रोखू शकलो. तिसऱ्या लाटेत फार कमी लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज होती. बहुतेक लोक सामान्य औषधांनी घरी राहून बरे झाले. 96 टक्के लोकसंख्येला लसीकरण मोहिमेशी जोडणं ही आपल्या देशाची ताकद आहे. MRNA लसीचे महत्त्व स्पष्ट करताना, डॉ. व्हीके पाल, सदस्य (आरोग्य), NITI आयोग म्हणाले की, आम्हाला अशा लसीची गरज आहे. लसींसाठी हे एक नवीन व्यासपीठ आहे. आम्ही या प्लॅटफॉर्मवर लस विकसित होत असल्याचं पाहिलं आहे. पुढे ते म्हणाले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अशा प्रकारची लस तयार करण्यात आली आहे. जगात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. ही लस प्रभावी ठरली आहे. ही लस मानवतेला दिलेली देणगी आहे. यामुळे प्रत्येक प्रकारातील कोविड रोखण्यात मदत झाली आहे. अशाप्रकारे, भविष्यातील रोग टाळण्यासाठी एक मार्ग सापडला आहे. भारतात पुण्यातील जेनोव्हा बायो फार्मास्युटिकल्स या कंपनीने या दिशेनं उल्लेखनीय कार्य केलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या