कोरोनावर औषध शोधण्यात भारताचीही आघाडी, या 5 शहरांमध्ये सुरू आहे प्रयोग

कोरोनावर औषध शोधण्यात भारताचीही आघाडी, या 5 शहरांमध्ये सुरू आहे प्रयोग

कोरोनावर लस शोधण्यासाठी त्या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ आणि सगळ्या दिग्गज कंपन्या या संशोधन करत आहेत. काही कंपन्यांनी औषध शोधल्याचा दावाही केला आहे.

  • Share this:

मुंबई 15 मे: कोरोनावर लस शोधण्यासाठी त्या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ आणि सगळ्या दिग्गज कंपन्या या संशोधन करत आहेत. काही कंपन्यांनी औषध शोधल्याचा दावाही केला आहे. त्यांचे माणसांवरही प्रयोग सुरू आहे. या संशोधनात भारतही अग्रेसर असून देशात २५ पेक्षा जास्त संशोधन प्रोजेक्टस सुरू आहेत. त्यात बऱ्याच प्रयोगांनी आघाडीही घेतली आहे. पंतप्रधानांनी कोरोनावर लस संशोधनासाठी १०० कोटी देण्याची घोषणाही केली आहे. केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांच्याकडे मदत देण्याचे अधिकार देण्यात आले आहे.   मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळूरू आणि चेन्नई या ५ मुख्य शहरांमध्ये हे संशोधन सुरु आहे. यातल्या अनेक कंपन्यांसोबत पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकही घेतली होती.

संशोधन सुरू असलेल्या या कंपन्यांमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्सचाही समावेश आहे. केंद्र सरकारकडे विविध कंपन्यांचे ७० पेक्षा जास्त प्रस्ताव आले आहेत. त्यात कोरोनावर लस शोधणं, कोरोनावर उपचार करण्यासाठीची साधणं निर्माण करणं आणि कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक सिस्टिम्स तयार करणं अशा पद्धतीचे हे प्रस्ताव आहेत.

देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 81 हजार 970 झाला आहे. यातील 51 हजार 401 केस या गंभीर आहेत. आज केंद्रीय आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 2649 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Lockdown मुळे गेली नोकरी, फळे आणि भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतोय ग्रॅज्युएट

तर, 27 हजार 919 लोकं निरोगी होऊन घरी परतली आहे. एकूण रुग्णांपैकी 111 रुग्ण परदेशी आहेत. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये गेल्या 24 तासांत भारतात 3967 रुग्णांची नोंद झाली आहे.

मोलकरणीच्या प्रेमात वेडा झाला मुलगा, सुपारी देऊन आई, वडिल,पत्नी, बहिणीची हत्या

 आतापर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर 33, आंध्र प्रदेश 2205, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 87, बिहार 994, चंडीगढ 191, छत्तीसगढ 60, दादर -नगर हवेली 1, दिल्ली 8470, गोवा 14, गुजरात 9591, हरियाणा 818, जम्मू-कश्मीर 983, झारखंड 197, कर्नाटक 987, केरल 560, लडाख 43, मध्य प्रदेश 4426, महाराष्ट्रात 27 हजार 524, मणिपुर 3, मेघालय 13, मिजोरम 1, ओडिशा 611, पुद्दुचेरी 13, पंजाब 1935, राजस्थान 4534, तमिळनाडु 9674, उत्तराखंड 78, उत्तर प्रदेश 3902 आणि पश्चिम बंगाल 2377, त्रिपुरा156, तेलंगणा 1414 तर हिमाचल प्रदेशमधून 59 प्रकरणं समोर आली आहेत.

 

 

First published: May 15, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading