'रॉयल इंडियन एअरफोर्स' बद्दल या 18 गोष्टी वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

भारताच्या हवाई दलाला राजा जॉर्ज सहावा याने रॉयल इंडियन एअरफोर्स अशी उपाधी दिली होती.

  • Share this:

भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. भारताच्या या Air Strike ने पाकिस्तान पुरता भेदरला आहे. हवाई दलाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. भारताच्या या Air Strike ने पाकिस्तान पुरता भेदरला. हवाई दलाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

जगातील हवाई दलांमध्ये भारतीय हवाई दल सुसज्ज आणि आधुनिक शस्त्रांसह कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतं. लष्करी ताकदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत जागतिक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. जगात भारताच्या हवाई दलाचा चौथा क्रमांक लागतो.

देशात भारतीय हवाई दलाची सात कमांडमध्ये विभागणी करण्याती आली आहे. त्यात 60 एअरबेस भारतभर आहेत.

पश्चिम एअर कमांडमध्ये 16 एअरबेस आहेत. तर सर्वात कमी 7 एअरबेस सेन्ट्रल एअर कमांडमध्ये आहेत. भारताचा एक एअरबेस ताजकीस्तानातील फरखोरमध्ये आहे.

पश्चिम एअर कमांडमध्ये 16 एअरबेस आहेत. तर सर्वात कमी 7 एअरबेस सेन्ट्रल एअर कमांडमध्ये आहेत. भारताचा एक एअरबेस ताजकिस्तानातील फरखोरमध्ये आहे.

रक्त गोठवणारी थंडी असलेल्या सियाचीन ग्लेशिअरचे एअरफोर्स स्टेशन 22 हजार फुट उंचावर आहे.

रक्त गोठवणारी थंडी असलेल्या सियाचीन ग्लेशिअरचे एअरफोर्स स्टेशन 22 हजार फूट उंचावर आहे.

भारतीय हवाई दलाचा लोगो 1933 पासून 4 वेळा बदलण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात अशोकचक्र हवाई दलाचा लोगो म्हणून वापरण्यात आले. याचवेळी राजा सहावा जॉर्ज याने रॉयल इंडियन एअरफोर्स अशी उपाधीही भारतीय वायुदलाला दिली होती.

भारताच्या हवाई दलात HF-24 Marut हे पहिलं लढाऊ 1961 ते 1985 या काळात कार्यरत होते. हे विमानाची निर्मिती हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने केली होती.

भारतीय सेनेकडून देण्यात येणारं सर्वात प्रतिष्ठेचं परमवीर चक्र भारतीय हवाई दलातील एकाच वीराला मिळालं आहे. 1971च्या भारत पाक युद्धात दाखवलेल्या शौर्यासाठी निर्मल जीत सिंह यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवण्यात आलं.

1965 च्या युद्धात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी सबरे या लढाऊ विमानांवर हल्ला चढवला होता. तेव्हापासून भारताच्या हवाई दलाला सबरे के कातील असंही म्हटलं जातं.

भारताच्या हवाई दलात मेडिकल सर्व्हिसच्या डायरेक्टर जनरल म्हणून रूजू झालेल्या पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला मार्शल होत्या.

भारतीय हवाई दलाला लष्करापासून स्वतंत्र करणारे थॉमस वॉकर एमहिस्ट हे पहिले कमांडर इन चीफ एअर मार्शल होते.

लडाखमध्ये सर्वात उंचीवर असलेल्या धावपट्टीवर 2013 मध्ये भारताच्या हवाई दलाने विमान उतरवले होते. 16 हजार 614 फुटांवर विमान उतरवून विश्वविक्रम नोंदवला होता.

भारताच्या ताफ्यात सी-17 ग्लोबमास्टर III, सी-130जे सुपर हर्क्युलस आणि II-76 या बलाढ्य मालवाहू विमानांचा समावेश आहे. अशी मालवाहून एअरक्राफ्ट असलेला भारत जगातील एकमेव देश आहे.

याआधी अनेक वेळा भारतीय वायुसेनेनं हवाई हल्ला करत आपल्या शत्रूला सडेतोड उत्तर दिलं आहे. 1965 मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये संपूर्ण वायु युद्ध झालं. 3 सप्टेंबर 1965 रोजी स्क्वॉड्रन लीडर ट्रेवोर किलरने पाकिस्तानी सेबर जेट एफ -86 एफ विमानाला ठार केलं होतं. (Photo credit: Indian Air Force)

4 सप्टेंबर, 1965 रोजी फ्लाइट लेफ्टनंट व्ही. एस. पठानिया Gnat विमान उडवत दुसऱ्या पीएफ सेबर जेट विमानाला पाडलं होतं. (Photo credit: Indian Air Force)

3 डिसेंबर 1971 रोजी इस्लामाबादने भारतीय वायुसेनाच्या अनेक ठिकानांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानी वायुसेनेच्या लढाऊ जेट्सने भारताकडे प्रवास केला. पाकिस्तानने या ऑपरेशनचं नाव 'चंगेज खान' ठेवलं होतं. 'चंगेज खान' ही 1971 मधील भारत-पाक युद्धाची पहिली अधिकृत लढाई होती. (Photo credit: Google)

या युद्धात 3 डिसेंबर 1971 च्या संध्याकाळी पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय वायुसेनेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्याचं उत्तर देताना भारतीय वायुसेनेने मिग-फाइटर विमानातून पाकिस्तानच्या 7 तळांवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानच्या 7 हवाई तळांचा नाश करण्यात भारतीय वायुसेनेला यश मिळालं होतं. (Photo credit: Indian Air Force)पुढे वाचा... भारताच्या या 10 शस्त्रांसमोर पाकिस्तानचा निभाव लागणं अशक्य

Su-30Mki: Su-30Mki हे वायुसेनेचं असं लढाऊ विमान आहे जे 21व्या शतकाच्या गरजेनुसार बनवलंय. रशियामध्ये तयार झालेलं सुखोई-30 जेट फाइटर हे सर्वात प्रभावी लढाऊ विमान मानलं जातं. याची लांबी 21.93 मीटर आहे, तर रुंदी 14.7 मीटर आहे. याचं हत्यारांशिवायचं वजन 18 हजार 400 कि.ग्रॅम आहे. यात हत्यारं टाकली तर वजन 26 हजार कि.ग्रॅम होतं. याचा वेग 2100 किमी. प्रति तास आहे. कितीही प्रतिकुल हवामानात हे लढाऊ विमान काम करतं.

 ब्रह्मोस मिसाइलची निर्मिती भारत आणि रशियानं मिळून केली. या मल्टिमिशन मिसाइलची मारक क्षमता 290 कि.मी. आहे. मिसाइलची गती ध्वनीपेक्षा तिप्पट आहे. हे मिसाइल जमीन, समुद्र, हवा कुठेही जाऊ शकतं. हे मिसाइल डोंगराच्या मागे लपलेल्या लक्ष्यावर हल्ला करू शकतं. ब्रम्होस्त्र एअर फायटरची सुखोई-30 एमकेआई फाइटरवरून उडाणाची टेस्ट केली जातेय.

आईएएनएस चक्र-2 ही पाणबुडी नौदलाचं मोठं शस्त्र आहे. ही पाणबुडी 600 मीटर पाण्याखाली राहते. तीन दिवस ती पाण्याखाली राहू शकते.

अवॉक्सः ‘एयरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम’ (अवॉक्स) आकाशात 400 किलेमीटरच्या वर काही धोका आहे का, हे पाहू शकतं.

INS विक्रमादित्यः 44,500 टनाचं विमान 2013मध्ये नौदलात सामील झालं. याची लांबी 283.1 मीटर आणि उंची 60.0 मीटर आहे. यावर 22 डेक आहेत. तीन फुटबाॅल मैदानाएवढं या विमानाचं क्षेत्रफळ आहे. यात 1600 लोकांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. हे 100 दिवस सलग समुद्रात राहू शकतं.

टी 90, भीष्मः हा रणगाडा ब्रम्हास्त्रसारखा आहे. पाच किमीपर्यंत हा रणगाडा हल्ला करू शकतो. यावर केमिकल किंवा बायोलाॅजिकल हल्ल्याचा परिणाम होत नाही. यातले सैनिक सुरक्षित राहू शकतात.

पी 81 नेप्ट्यूनः भारताची 7500लांब सीमारेखा फक्त बर्फाळ भागातली आहे. तिचं रक्षण करण्यासाठी याची निर्मिती केलीय. 4 तास हवेत उडू शकतं. पाणबुडीचाही शोध घेऊ शकतं. हे सर्वात लांबवर काम करणारं रडार आहे.

नामिका (नाग मिसाइल कॅरियर): हे मिसाइल टॉपअॅटॅक- फायर अँड फोरगेट आणि सर्व मोसमात काम करू शकतं. हलक्या वजनाच्या हेलिकाॅप्टरलाही हे लावता येतं.

PAD/ AAD बैलेस्टिक मिसाइल डिफेंस (BMD) सिस्टमः अत्यंत कमी अवधीत हे मिसाइल सुरक्षेसाठी तयार होऊ शकतं. PAD 2 हजार किमीपर्यंत मारा करू शकतं. यात इंटरसेप्टर मिसाइल, PAD (पृथ्वी एयर डिफेंस) और AAD (एडवांस एयर डिफेंस) समाविष्ट आहेत.

पिनाका एमएलआरः याचं काम तोफांच्या 30 किमीबाहेरचं लक्ष्य साधणं. छोट्या युद्धांमध्ये याचा वापर होतो.

या फोटो गॅलरीत ठराविकच शस्त्रांचा उल्लेख आहे. राफेल, अर्जुन Mk2, बराक-8, INS विक्रांत यात नाही. ( defencyclopedia माहितीनुसार )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या