मराठी बातम्या /बातम्या /देश /Appsवर बंदी घातल्यानंतर भारताचा चीनला पुन्हा दणका, घेतला मोठा निर्णय

Appsवर बंदी घातल्यानंतर भारताचा चीनला पुन्हा दणका, घेतला मोठा निर्णय

Made In China असं लिहिलेलं असेल तर आता काही कंपन्यांना फटका बसणार आहे.

Made In China असं लिहिलेलं असेल तर आता काही कंपन्यांना फटका बसणार आहे.

Made In China असं लिहिलेलं असेल तर आता काही कंपन्यांना फटका बसणार आहे.

नवी दिल्ली 4 सप्टेंबर: चीनच्या 118 Appsवर बंदी घातल्यानंतर भारताने चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. चीन मधून आयात होणारं औषध सिप्रोफ्लोक्सासिन (Anti-Bacterial Drug Ciprofloxacin)वर Anti-Dumping Duty लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यामुळे चिनी औषध कंपन्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. Made In China असं लिहिलेल्या औषधांवर हा कर लागणार आहे. ओषधं चीनमधून किंवा इतर देशांमधूनही आयात करण्यात आली तरही त्यांना Anti-Dumping Duty दयावी लागणार आहे.

देशातल्या काही कंपन्यांच्या तक्रारींच्या आधारे चौकशी करून हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर भारतातल्या कंपन्यांना नुकसान होत असल्याचं आढळून आलं होतं. 2015-16 मध्ये 117 औषधांसाठीचा कच्चा माल आयत करण्यात आला होता. 2018-2019मध्ये त्याचं प्रमाण हे 377 टनांवर गेलं होतं. त्यामुळे देशी कंपन्यांना होणारं नुकसान थांबविण्यासाठी चिनी आयातीवर अँटी-डम्पिंग ड्यूटी लावण्याची शिफारस करण्यात आली.

भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या गंभीर तणावादरम्यान भारताने चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने बुधवारी 118 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी लावली. यामध्ये PUBG व्यतिरिक्त Baidu, APUS लॉन्चर प्रो सारख्या अॅप्सचाही समावेश आहे. भारताने चीनविरोधात घेतलेल्या निर्णयानंतर चीनची तंतरली आहे.

चीन भारताला सर्व बाजूंनी घेरतोय, शरद पवारांनी मोदी सरकारला दिला इशारा!

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने (Commerce Ministry) भारत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आणि भारताला आपली चूक सुधारण्यास सांगितले आहे. न्यूज एजंसी रॉयटर्सनुसार चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की ते चिनी मोबाइल अॅप बंद करण्यासाठी भारताने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करीत आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चिनी गुंतवणुकदार आणि सेवा देणाऱ्यांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन केले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ता गाओ फेंग यांनी सांगितले की, चीनने भारताला आपली चूक सुधारण्यास सांगितले आहे.

500 चिनी सैन्यांना घेराव घालून भारतीय सैन्यानं मिळवला Strategic heightवर कब्जा

भारताने डेटा सुरक्षाचे कारण देत बुधवारी प्रसिद्ध व्हिडीओ गेम PUBG सह 118 मोबाइल अॅप्सवर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली होती. PUBG या अॅपमध्ये चीनची कंपनी टेनसेंट होल्डिंस लिमिटेडचा भागभांडवल होते.

First published:
top videos