भारतीय जवानांनी घेतला बदला, पाकच्या दोन लष्करी छावण्या केल्या उद्धवस्त

भारतीय जवानांनी घेतला बदला, पाकच्या दोन लष्करी छावण्या केल्या उद्धवस्त

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकच्या 2 लष्करी छावण्या उद्ध्वस्त

  • Share this:

02 मे :  पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांना मारुन त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं. त्यानंतर जिथून पाकचे सैनिक भारताच्या हद्दीत घुसले होते, त्या दोन छावण्याच भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. या मध्ये सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले आहेत. परंतु, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाक सैन्यानं रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने पूर्वनियोजित सापळा रचून केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर आणि नायब सुभेदार परमजीत सिंग शहीद झाले होते. या गोळीबारानंतर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने या दोन्ही जवानांच्या पार्थिवांशी विटंबना करण्याचं लज्जास्पद कृत्य केलं. लष्करातही संतापाची लाट उसळली होती. या संपूर्ण घटनेची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली होती. या पार्श्वभूमीवर, पाकच्या क्रूर कृत्याला भारतीय लष्कर तोडीस तोड प्रत्युत्तर देईल, असे सूचक संकेत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिले होते.

त्यानंतर, काही उच्चस्तरीय बैठका झाल्या. त्यात, केंद्र सरकारकडून लष्कराला 'फ्री हँड' देण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे मनोबल उंचावलेल्या जवानांनी लगेचच पाकच्या दोन छावण्यांवर हल्ला चढवल्याचंही समजतं. ही कारवाई नेमकी केव्हा झाली आणि त्यात किती पाकिस्तानी सैनिक ठार झाले याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

First published: May 2, 2017, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading