‘कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताने केली 150 देशांना मदत’, PM मोदींच्या भाषणातले मुख्य 5 मुद्दे

‘कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताने केली 150 देशांना मदत’, PM मोदींच्या भाषणातले मुख्य 5 मुद्दे

कोरोनाविरुद्धची लढाई ही कुठल्या देशाची नाही तर ती सगळ्या मानवजातीची आहे. त्यामुळे सगळे मतभेद विसरून सर्व जगाने एकत्र आलं पाहिजे.

  • Share this:

 नवी दिल्ली 17 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज संयुक्त राष्ट्राच्या UNESC परिषदेला संबोधित केलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य झाल्यानंतरचं पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण होतं. यावेळी बोलतांना मुख्य मुद्दा हा कोरोना आणि त्याविरुद्धची लढाई असाच होता. पंतप्रधान म्हणाले कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना सहभागी करून घेत आम्ही जनआंदोलनाचं स्वरुप दिलं. त्यामुळे ही साथ तुलनेने नियंत्रणात राहू शकली. हे करत असतांनाच भारताने औषधांचा जगातल्या 150 देशांना पुरवढा केला अशी माहितीही त्यांनी दिली.

संयुक्त राष्ट्राच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पंतप्रधान म्हणाले, जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कोरोना नियंत्रणात राहिला आहे. आणि आम्ही यापुढेही त्यावर नियंत्रण मिळवल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनाविरुद्धची लढाई ही कुठल्या देशाची नाही तर ती सगळ्या मानवजातीची आहे. त्यामुळे सगळे मतभेद विसरून सर्व जगाने एकत्र आलं पाहिजे. हीच काळाजी गरज असून इतिहास त्याची समिक्षा करेल असंही ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्राच्या कामकाजात सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यात फक्त बड्या देशांचीच मक्तेदारी राहू नये तर सगळ्यांच देशांचा सहभाग अधिक चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनामुळे गरिबांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या उपाययजोनांची माहिती त्यांनी दिली. 80 कोटी लोकांना सरकार नोव्हेंबर महिन्यांपर्यंत अन्नधान्य पुरवेल अशी माहितीही त्यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 17, 2020, 11:01 PM IST

ताज्या बातम्या