कोरोनाला रोखण्यासाठी का आहेत भारताकडे फक्त 30 दिवस? जाणून घ्या कारण

कोरोनाला रोखण्यासाठी का आहेत भारताकडे फक्त 30 दिवस? जाणून घ्या कारण

30 दिवसात कोरोनाला न रोखल्यास भारताच्या अडचणी वाढणार, तज्ञांनी दिले कारण

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी जगातली सर्व देश प्रयत्न करत आहे. शास्त्रज्ञांच्या मते येते 30 दिवस भारतासाठी महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी भारतावर काय परिणाम होईल यासाठी 30 दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. भारतात सध्या कोरोना दुसऱ्या टप्प्यात असल्य़ामुळे तिसऱ्या टप्प्यात पोहचण्यासाठी भारताकडे 30 दिवसांचा कालावधी आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास आणि अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्यास भारतात हा विषाणू आणखी तीव्रतेने पसरण्याची शक्यता आहे.

कोरोनाची गती कमी झाल्यास भारताकडे असेल वेळ

विषाणूच्या प्रसाराच्या विविध टप्प्यांचा संदर्भ देताना डॉ. भार्गव यांनी, पहिल्या टप्प्यात कोरोना बाहेरील देशातून येतो. चीनमधील तीन रुग्णांसह केरळमध्ये 30 जानेवारी रोजी कोरोना भारतात पसरल. विषाणूचा प्रसार झाल्यानंतर, दुसरा टप्प्यात कोरोनाग्रस्त रुग्ण देशातील इतरांना संक्रमित करण्यास सुरवात करते. हे संक्रमण बाधित व्यक्तीशी जवळच्या संपर्कापुरते मर्यादित आहे. या प्रकारचा कोरोना संसर्ग फेब्रुवारीच्या अखेरीस आग्रा आणि केरळमधील एकाच कुटुंबातील सहा लोकांमध्ये झाला. म्हणजेच पहिल्या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात जायला एक महिना लागला. तिसरा टप्पा हा विषाणूचा प्रसार करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. या टप्प्यात विषाणू सामान्य लोकांमध्ये पसरू शकतो. विषाणू मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे साथीच्या रोगात रुपांतर होते.

वाचा-लवकरच कोरोनाला सारं जग हरवणार, 'या' देशात सुरू आहे लसीची चाचणी

भारतात कोरोनाचा दुसरा टप्पा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी, "भारत Covid-19 सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या पदेशातून प्रवास केलेल्या लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. व्हायरस थांबविणे सध्या सरकारसाठी महत्त्वाचे आहे”, असे सांगत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारताकडे 30 दिवस आहेत, असेही ते म्हणाला. 30 दिवस कोरोनाला रोखल्यास तो तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार नाही.

वाचा-Coronavirus मुळे मुंबईत जिम बंद, जॅकलिननं शेअर केले HOT योगा व्हिडीओ

येते 30 दिवस भारतासाठी महत्वाचे

येते 30 दिवस भारतासाठी दोन कारणांमुळे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भारतात कोरोना संसर्ग होण्याच्या प्रमाणात तुलनेने वेगाने वाढ झाली आहे. एकाकडून दुसर्‍याकडे आणि दुसऱ्याकडून तिसर्‍या टप्प्यात पोहचण्यासाठी 25-30 दिवसांचे अंतर आहे. सध्या परदेशातून येणाऱ्यांवरून सध्या भारतात बंदी आहे.

वाचा-कोरोनाचा कहर! मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत 7 हजार लोकांचा घेतला जीव

चीन-इटलीमध्ये सहाव्या टप्प्यात आहे कोरोना

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading