मोदी सरकार शोधणार औरंगजेबाच्या भावाची कबर, 7 सदस्यांच्या समितीची स्थापना

मोदी सरकार शोधणार औरंगजेबाच्या भावाची कबर, 7 सदस्यांच्या समितीची स्थापना

हिंदू आणि मुस्लिम परंपरामध्ये साम्य शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दारा शुकोहची कबर शोधण्यासाठी समिती नेमली असली तरी हे काम कठीण असल्याचे मत पुरातत्ववाद्यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : मुघल बादशाह शाहजहाचा मोठा मुलगा दारा शुकोहला ठार करून गादीच्या रक्तरंजित लढाईत औरंगजेबने बाजी मारली. इतिहासात दारा शुकोहला उदारमतवादी म्हणून ओळखलं जातं. त्यानं हिंदू आणि मुस्लिम परंपरांमध्ये साम्य शोधण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच दारा शुकोहची कबर मोदी सरकार शोधणार आहे. दारा शुकोहने गीता या हिंदूंच्या धार्मिंक ग्रंथाचा फारसी भाषेत अनुवाद केला होता. याशिवाय 52 उपनिषदांचाही अनुवाद केला होता.

केंद्र सरकारने दारा शुकोहची कबर शोधण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समितीला यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. कबर शोधण्याचं काम सोपं नाही कारण जिथं दारा शुकोहची कबर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तिथं अनेक कबरी आहेत. त्यावर कोणाचेही नाव किंवा इतर उल्लेख नाही.

भारतीय पुरातत्व विभागाकडून दारा शुकोहच्या कबरीचा शोध घेतला जाणार आहे. दिल्लीतील हुमायुच्या कबरीच्या परिसरात असण्याची शक्यता आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक टी जे अलोन हे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय पुरातत्व अभ्यासक आर एस बिश्त, सईद जमाल हसन, के एन दिक्षित, बी आर मानी, के के मुहम्मद, सतिश चंद्रा, बी एम पांडे हे सदस्य आहेत. या कबरीचा शोध घेण्यासाठी तत्कालिन पुराव्यांचा अभ्यास केला जाईल. यामध्ये लिखित स्वरुपातील इतिहास आणि इतर साधनांचा पुरावा म्हणून वापर केला जाईल असं समितीने म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे.

शाहजहाननामा यामध्ये दारा शुकोह पराभूत झाल्यानंतर त्याचे शीर कापून आग्र्याला पाठवण्यात आल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर दाराचे धड हुमायूच्या कबरीशेजारी दफन करण्यात आलं होतं. या परिसरात सर्व मुघल शासकांच्या कबरी आहेत आता त्यात दारा शुकोहची कबर शोधणं कठीण काम असल्याचं पुरातत्ववादी के.के. मोहम्मद यांनी म्हटलं आहे.

वाचा : पंचायतीचा गजब फतवा; गायीच्या मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून अल्पवयीन मुलीचं लग्न

दारा शुकोहचा मृत्यू 30 ऑगस्ट 1659 मध्ये झाला होता. शाहजहानचा लाडका असलेल्या दारा शुकोहची ओळख उदारमतवादी आणि विचारवंत अशीच होती. शाहजहानंतर गादीसाठी संघर्ष झाला त्यात दारा शुकोहकडे लहान भाऊ औरंगजेबाच्या तुलनेत जास्त सैन्य होते. मात्र राजकीय डावपेचांची कमतरता आणि विश्वासू लोकांनी दिलेल्या दग्यामुळे दारा शुकोहला औरंगजेबाने पराभूत केलं. त्यानंतर औरंगजेबाने दारासह त्याच्या मुलांना बंदी केलं. काही दिवस कैदेत ठेवल्यानंतर दाराचा शिरच्छेद करण्यात आला होता.

वाचा : शाहीन बाग आंदोलन मागे घेणार? सुप्रीम कोर्टाने मध्यस्तीसाठी केली वकिलाची नियुक्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2020 04:11 PM IST

ताज्या बातम्या