मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमेरिकेच्या दुतावासावर हल्ल्यानंतर भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून हालचाली

अमेरिकेच्या दुतावासावर हल्ल्यानंतर भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून हालचाली

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही इराणने पुन्हा एकदा अमेरिकन दुतावासावर हल्ला केला. यानंतर अमेरिका आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आखाती देशांमधील परिस्थितीबद्दल चर्चा केली.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 06 जानेवारी : इराणच्या लष्कराचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ठार केल्यानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. इराणने पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला हल्ला केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेसह आखाती देशातील परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. आखाती देशात वाढत्या संघर्षामुळे होत असलेल्या परिणामांची जाणीव त्यांना करून देण्यात आली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणमधील जवाद जरीफ यांच्याशी चर्चा केली. इराणमधील तणावाची भारताला चिंता आहे.

जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ आणि ओमानचे परराष्ट्र मंत्री यूसुफ अलावी यांच्याशीदेखील चर्चा केली. जयशंकर यांनी ट्विट करून सांगितले की, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आताच चर्चा झाली. सध्याच्या घडामोडींनी गंभीर वळण घेतलं आहे. भारत या तणावाच्या वातावरणामुळे चिंतीत आहे. आम्ही संपर्कात राहू असं सांगितलं.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पिओ यांच्याशी चर्चा करून त्यांना भारताच्या अडचणींची जाणीव करून दिली. जयशंकर म्हणाले की, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीबाबत माइक पोम्पिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारताच्या हिताबाबत आणि काळजीच्या गोष्टींची माहिती त्यांना दिली.

याशिवाय ओमानच्या मंत्र्यांसोबतही जयशंकर यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी ट्विट केलं की, आखाती देशात सुरु असलेल्या तणावावरून ओमानचे परराष्ट्र मंत्री युसुफ अलावी यांच्याशी चर्चा केली. तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली.

इराणच्या टॉप कमांडरला ठार केल्यानंतर अमेरिकेनं आणखी एक हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसात इराणकडून अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला करण्यात आला. याच दरम्यान इराणने मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धच पुकारलं आहे. दुसऱीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने काही पावलं उचलली तर त्यांची 52 ठिकाणं आमच्या निशाण्यावर असून ती उद्ध्वस्त करू असा इशारा दिला आहे.

अमेरिकेनं ठार केलेल्या मेजर सुलेमानने घेतली होती भारताची बाजू!

First published: