17 नोव्हेंबर : गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 597 फूट उंच पुतळा अर्थात 'स्टॅच्यू आॅफ युनिटी' चं उद्घाटन झाल्यानंतर चर्चेत आला. अवघ्या जगाच लक्ष्य यावर केंद्रीत झालं आहे. आता तर अमेरिकेच्या एका कंपनीने अंतराळातून 'स्टॅच्यू आॅफ युनिटी' चे फोटो काढले आहे.
अमेरिकन कंपनी स्काय लॅबच्या मालकीची असलेल्या 'द अमेरिकन कॉन्स्टेलेशन आॅफ सॅटेलाइट्स' अंतराळातून नर्मदेच्या किनाऱ्यावर बनलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. या फोटोमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा वरच्या बाजूने दिसत आहे.
अमेरिकेच्या कमर्शियल सॅटेलाईट नेटवर्क प्लॅनेटने हे फोटो काढून टि्वटर अकाऊंटवर शेअर केले आहे. सॅटेलाईटने हे फोटो १५ नोव्हेंबर रोजी काढले होते.
पंतप्रधान मोदींनी ३१ आॅक्टोबर रोजी जगातली सर्वांत उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीची उद्घाटन केलं होतं.लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या मुर्तीचे अनावरण त्यांच्या १४३ व्या जयंतीच्या दिनी करण्यात आले होते. त्यांचा हा पुतळा १८२ मिटर उंच असून अमेरिकेच्या स्टॅच्यू आॅफ लिबर्टीहुन उंच आहे.
====================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Space, Statue of unity, USA