भारतापेक्षा पाकिस्तानमधील लोक अधिक आनंदी, पाहा काय सांगतोय UNचा अहवाल

भारतापेक्षा पाकिस्तानमधील लोक अधिक आनंदी, पाहा काय सांगतोय UNचा अहवाल

जगातील आनंदी देशांची यावर्षाची यादी संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च: जगातील आनंदी देशांची यावर्षाची यादी संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केली आहे. यावर्षाच्या यादीत भारताचा क्रमांक 140वा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताचे स्थान 7 क्रमांकांनी घसरले आहे. यादीत फिनलँडने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. यादीतील एक धक्कादायक माहिती अशी की आनंदी देशांच्या क्रमवारीत भारत शेजारी पाकिस्तानपेक्षा पिछाडीवर आहे.

उत्पन्न, निरोगी आयुष्य, सामाजिक परिस्थिती, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या 6 घटकांच्या आधारावर संयुक्त राष्ट्र संघ आनंदी देशांची यादी जाहीर करतो. त्यानुसार दर वर्षीप्रमाणे यंदा देखील ही यादी जाहीर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 2012पासून 20 मार्च हा जागतिक आनंदी दिवस म्हणून घोषित केला होता. यंदाच्या अहवालात जागतिक आनंदात घसरण झाल्याचे म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचा हा सातवा आनंदी देशांचा अहवाल आहे. यात 156 देशांचा समावेश आहे.  गेल्यावर्षी या यादीत भारत 133व्या स्थानावर होता. यंदा भारत 140व्या क्रमांकावर आहे. यादीत फिनलँड पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँड यांचा क्रमांक लागतो. युद्धग्रस्त दक्षिण सुदानमधील नागरिक सर्वाधिक नाखूश असून त्यानंतर मध्य अफ्रिकन गनराज्य, अफगाणिस्तान, टांझानिया आणि रवांडा यांचा क्रमांक लागतो. आशियातील देशांमध्ये पाक 67व्या, चीन 93व्या तर बांगलादेश 125व्या स्थानावर आहे.


VIDEO : 'खासदार व्हायचं म्हणून जमीन विकली'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या