भारताचा विकासदर सात ते साडे सात टक्के, आर्थिक पाहणी अहवाल सादर

भारताचा विकासदर सात ते साडे सात टक्के, आर्थिक पाहणी अहवाल सादर

आर्थिक पाहणी अहवाल सादर झालाय. 2019च्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर सात ते साडे सात टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यावर्षीचा विकासदर पावणे सात टक्के असेल असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला आहे.

  • Share this:

29 जानेवारी : आर्थिक पाहणी अहवाल सादर झालाय. 2019च्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर सात ते साडे सात टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यावर्षीचा विकासदर पावणे सात टक्के असेल असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सेन्सेक्स वधारला आहे.

300 पेक्षा जास्त अंकांनी सेन्सेक्स वर गेलाय. तेलाच्या वाढत्या किमती हा चिंतेचा विषय आहे, असंही या अहवालात म्हटलंय. सध्याच्या परिस्थितीत सर्वात जास्त प्रगतीचा स्रोत हे निर्यात क्षेत्र आहे, जीएसटीमुळे काही अनपेक्षित अडथळे आले, पण सरकारनं त्वरित सुधारणा केल्यामुळे मदत झाली, असंही या अहवालात म्हटलंय. न्यायालयीन कामकाजातील दिरंगाई, पेंडिंग खटले याकडेही गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

आर्थिक सर्वेक्षणातील काही महत्त्वाचे मुद्दे 

- खासगी गुंतवणुकीत सुधारणा होईल तसेच निर्यातीलाही चालना मिळेल.

-   आगामी वर्षात आर्थिक व्यवस्थापन आव्हानात्मक असेल.

 - अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल बनवला आहे.

-   प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे.

- आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय व्यापारावर राज्यांची समृद्धता अवलंबून आहे.

-  चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर 2.1 टक्के राहण्याचा अंदाज.

- 2017-18 चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 3.2 टक्के राहण्याचा अंदाज.

- 12 % पर्यंत कच्चा तेलाच्या किंमती वाढू शकतात. त्यामुळे महागाई भडकण्याचा धोका.

First published: January 29, 2018, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading